19 मार्च 2022 सकाळचे बातमी अपडेट...

19 मार्च 2022 सकाळचे बातमी अपडेट...


  राज्यात तापमान वाढतंय.. विदर्भातील सर्व प्रमुख शहरांमध्ये पारा 40शी पार झाला आहे.. कालही चंद्रपुरात कमाल तापमान 43 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे..


 योगी आदित्यनाथ 25 मार्च रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थिती लावणार आहेत... शपथविधी सोहळ्याची तयारी सुरु झाली आहे..


  देवदर्शनावरुन येताना सांगोला तालुक्यात सोनंदजवळ भीषण अपघात झाला... पंढरपूर तालुक्यातील तिघांचा मृत्यू, ट्रकने धडक दिल्याने दुर्दैवी घटना झाली आहे..


 कोल्हापुरात 30 लाख 67 हजारांची दारु जप्त करण्यात आली आहे.., एकाला अटक तर इतर साथीदारांचा शोध सुरु करण्यात आला आहे.. राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे..


  100 कोटी क्लब 'द कश्मीर फाईल्स’ चित्रपट 650 स्क्रीन्सवरून 4 हजारांहून अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार आहे.. फक्त आठ दिवसांतच शंभर काेटीची कमाई करण्यात आली आहे..


 जगात सर्वात जास्त वापरले जाणारे नेव्हिगेशन ॲप Google Maps क्रॅश झाल. गुरुवारी उशिरा भारतीय वेळेनुसार रात्री 9:30 वाजता क्रॅश झाला होत.


 ओला एस 1 प्रोची किंमत आजपासून वाढवण्याची ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी घोषणा केली आहे.., यापूर्वी या गाडीची किंमत 1,29,999 रुपये होती..


 युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना नोबेल मिळण्याची शक्यता आहे... नामांकन प्रक्रियेवर पुनर्विचार व्हावा, युरोपियन नेत्यांच्या समितीची मागणी केली आहे..


 पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार कोसळण्याच्या स्थितीत आहे.., विरोधी पक्षांचे अविश्वास ठरावात सरकारच्या बाजूने मतदान न करण्याचे संकेत आहेत..


  कर्नाटकमधील शाळांत भगवद्गीतेचे पाठ शिकविण्याचा राज्य सरकारचा विचार केला आहे, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी माहीती दिली आहे...


                धन्यवाद.....

Comments