21 मार्च 2022 सकाळचे बातमी अपडेट...
रशिया vs युक्रेन रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यासोबत वाटाघाटीला तयार झाले, पण जर हे अयशस्वी झाले तर याचा अर्थ तिसरे महायुद्ध होऊ शकते असे व्लादिमीर झेलेन्स्की यांनी म्हंटले आहे.
'कोविशिल्ड' या लसीच्या दोन डोसमधले अंतर कमी करण्याचा निर्णय होण्याची शक्यता जास्त आहे.. NTAGI ची याबाबत केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे..
मनसेकडून शिवजयंती जल्लोषात साजरी होणार आहे.., आज राज ठाकरेंकडून शिवाजी पार्कमध्ये महाराजांच्या पुतळ्यावर हॅलीकॉप्टरने पुष्पवृष्टी होणार आहे... तर अमित ठाकरे शिवजयंतीसाठी शिवनेरीवर जाणार आहेत..
केरळमध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे.. सुमारे 2 हजार प्रेक्षकांवर कोसळली स्टेडियमची गॅलरी, 200 जण जखमी झाले., घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे..
महाराष्ट्रात काही भागात पावसाळी वातावरण झाले आहे., पुढील दोन दिवसांत सर्वत्र दिवसाच्या कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होण्याची शक्यता आहे.. असा अंदाज हवामान विभागाने वर्त्विल आहे..
हैदराबाद फुटबॉल क्लबने पेनल्टी शूटआऊटच्या जोरावर कोरलं आयएसएल चषकावर आपलं नाव, केरळा ब्लास्टर्सचं विजयाचं स्वप्न भंग झाला..
बिहारमध्ये मृत्यूचे तांडव सुरु आहेत. विषारी दारू प्यायल्याने 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एका व्यक्तीची दृष्टीही गेली तर काहींना रुग्णालयात दाखल केलं आहे..
भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचं रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.., ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेचा अंतिम सामना 21-10, 21-15 अशा फरकाने गमावला गेला ..
कोरोना अपडेट: मागील 24 तासांत (काल) राज्यात 113 नवे रुग्ण आढळल्याने राज्यातील सक्रीय रुग्णसंख्या 1354 वर पोहोचली आहे.. तर्, 283 जण कोरोनामुक्त झाले आहे...
Comments
Post a Comment