26 मार्च 2022 सकाळचे बातमी अपडेट...
एसटी संपामुळे जिथे शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांना अडचण होत आहे, तिथे पर्यायी व्यवस्था देणार असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी माहीती दिली आहे..
IPL आजपासून सुरु होणार आहे.. 10 संघ, 65 दिवस, 74 सामने होतील.. आज चेन्नई-कोलकाता मध्ये पहिला सामना सायं. 7.30 वाजता सुरू होणार आहे..
बीड तालुक्यातील शिवसेनेचे तालुका उपप्रमुख गणेश मोरेंचा अपघातात मृत्यू झाला आहे.. बीडहून लिंबागणेश येथे गावी जात असतांना दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे आपघात् झाला...
अनिल धीरुभाई अंबानी ग्रुप (ए़डीएजी) चे चेअरमन अनिल अंबानी यांनी रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इफ्रास्ट्रक्चरच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे..
राज्य सरकारने मॉल, सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिली असली तरीही विक्रीसाठी कोणतीही सक्ती दिलेली नाही.. असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विधानसभेत भाष्य केलं..
अभियांत्रिकी, दूरसंचार आणि आरोग्य सेवा क्षेत्रात पुढील पाच वर्षांत 1.2 काेटी नवीन रोजगार निर्माण होतील.. हायरिंग सेवा प्रदान करणाऱ्या टीमलीज कंपनीचा अहवाल देण्यात आला आहे..
सोलापूर आणि अक्कलकोटच्या बदल्यात कर्नाटकला बेळगाव मिळाल्याने सीमाप्रश्न अस्तित्वातच आला नाही.. असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचं वादग्रस्त विधान
कोकणातील हापूस आंबा शेतकऱ्यांनी जगभरात पोहोचवण्यासाठी बनवला 'एक्याम' ब्रँड, स्विस-भारतीय खाद्य व तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म इन्नोटेरासोबत भागीदारी केली आहे..
पुणे शहरात 1 एप्रिलपासून 1 टक्का मेट्रो अधिभार आणि नवीन व वाढीव रेडीरेकनर दरदेखील लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.... नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाकडून आदेश दिले आहे..
Comments
Post a Comment