12 मार्च 2022 सकाळचे बातमी अपडेट...
भारताच्या एक सुपरसॉनिक प्रोजेक्टाईल मिसाईलचा निशाणा थेट पाकिस्तानमध्ये पाकिस्तानच्या आरोपानंतर मिसाईल चुकून डागल्याचं सांगत भारताकडून खेद व्यक्त केला आहे..
राज्यात पुन्हा अवकाळीचा फटका, पुढील काही तासात पश्चिम महाराष्ट्रासह, कोकणात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे, पावसाची शक्यता वर्तवन्यात आली आहे..
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून सुरु होणार आहे.. सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे..
राज्याचा महाअर्थसंकल्प 2022 महिला, शेतकरी आणि गरीबांसाठी अनेक पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे.. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई-पुण्यावर जास्त लक्ष दिले जात आहे.
'पेटीएम'ला रिझर्व्ह बँकेचा दणका, नवीन ग्राहक जोडण्यास मनाई पेटीएम पेमेंट बँकेचा आयटी लेखा परीक्षण अहवाल तपासल्यानंतर पुढील निर्णय होणार आहे..
पुढील आर्थिक वर्षांत राज्यावरील कर्जाचा बोजा हा साडेसहा लाख कोटींवर जाणार आहे. यंदाच्या वर्षांत तूट ही 20 हजार कोटींनी वाढली आहे..
चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार चालू आहे. चीनच्या चांगचुन या 90 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येणार आहे..
गाणगापूर येथून देवदर्शन करुन अक्कलकोटच्या दिशेने परतताना वाटेतच गाडीचा टायर फुटल्यामुळे काल दुपारी कारचा भीषण अपघात झाला आहे. त्यामधे 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे..
राज्यात काल 318 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.., 355 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.. राज्यात सध्या 2925 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, रिकव्हरी रेट 98.09 टक्के झाला आहे..
Comments
Post a Comment