16 मार्च 2022 सकाळचे बातमी अपडेट...
बोर्डाच्या परीक्षेला वेळेतच केंद्रावर उपस्थित रहा, अन्यथा प्रवेश नाकारला जाणार , उशिरा आल्याने गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास आल्याने बोर्डाने हा निर्णय घेतला आहे..
मदर डेअरी, अमूलच्या दरात वाढ झाल्यानंतर आता महानंद, चितळे, गोवर्धन, कात्रज दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांची वाढ झाली आहे, व नवीन दर लागू झाले आहेत....
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर झेलेन्स्की यांची युरोपीयन राष्ट्रांकडे शस्त्रांची मागणी केली आहे.., रशिया-युक्रेन युद्ध आणखी पेटण्याची शक्यता आहे..
विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने घेतला मोठा निर्णय; अध्यक्षा सोनिया गांधी यांनी यूपी, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरच्या पक्ष प्रमुखांना राजीनामा मागितला आहे..
घरांच्या प्रतिक्षेत असणाऱ्या नागरिकांना नवी मुंबईत घरांसाठी अर्ज करता येणार आहेत., होळीच्या निमित्ताने सिडकोकडून 1900 घरांची लॉटरी जाहीर केली आहे...
महिंद्रा XUV700 भारतातील सर्वात सुरक्षित कार -अहवाल, NCAP ने #SaferCarsForIndia campaign अंतर्गत आतापर्यंत 50 कार्सची क्रॅश टेस्ट केली आहे..
महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेने असहकार आंदोलनाचा पवित्रा घेतला, मागण्या मान्य नाही झाल्या तर अत्यावश्यक रुग्णसेवाही बंद करण्याचा इशारा दिला आहे..
भारतामधील मोबाइल ब्रॉडबँड ग्राहक संख्या मागील 5 वर्षांत 345 दशलक्ष वरून 765 दशलक्ष, सरासरी मोबाईल डेटा वापर प्रति वापरकर्ता 17GB पर्यंत अहवाल पोहोचला आहे..
Comments
Post a Comment