15 मार्च 2022 सकाळचे बातमी अपडेट...
भारत एमका या लढाऊ विमानाचे अद्यावत स्टेल्थ फायटर जेट्स बनवणार आहे.., प्रोटोटाइप डिझाइन, मॉडेलसाठी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीकडून मंजुरी मिळवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे..अशी संरक्षण राज्यमंत्र्यांची माहिती दिली आहे..
देशातील 12 ते 14 वयोगटातील मुलांचे कोरोना लसीकरण 16 मार्चपासून सुरू होणार आहे.., केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी घोषणा केली आहे..
राज्यात दहावीची परीक्षा 15 मार्चपासून (आज) सुरु होणार आहे.., 16,39,172 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.., मुख्य केंद्र आणि उपकेंद्र मिळून 21 हजार 384 ठिकाणी परीक्षा होणार आहेत...
आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू संदीप नंगल याची हत्या करण्यात आली आहे., कबड्डी सामन्यादरम्यान संदीपवर झाडण्यात आल्या गोळ्या रुग्णालयात घेऊन जाताना संदीप नंगल याचा मृत्यू झाला आहे..
जुन्या वाहनांच्या पुनर्नोंदणीसाठी लागणारं शुल्क 1 एप्रिल 2022 पासून जवळपास आठ पटींनी वाढणार आहे.., केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाची माहीती मिळाली आहे..
तीन महिन्यांच्या आत इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) राजकीय मागासलेपणाचा अहवाल सादर करा, नवीन आयोगाला राज्य सरकारची सूचना देण्यात आली आहे..
पेनड्राईव्ह बॉम्बप्रकरणी सीआयडी चौकशी होणार, कुणालाही पाठिशी घालणार नाही. अशे गृहमंत्री वळसे पाटील यांनि काल विधिमंडळ अधिवेशनात माहीती दिली आहे..
रशिया-युक्रेन युद्ध सुरुच राहिल्यास युक्रेन वर्षाच्या अखेरीस त्याच्या जीडीपीच्या 25 ते 35 टक्क्यांनी गमावू शकतो असा आयएमएफकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे..
कोल्हापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न महावितरणने वीज कनेक्शन कट केल्याने महावितरणच्या कार्यालयातच अंगावर डिझेल ओतले.
राज्यात गेल्या 24 तासात 157 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू तर काल दिवसभरात 298 रुग्णांनी केली कोरोनावर मात करण्यात आली आहे..
धन्यवाद....
Comments
Post a Comment