14 मार्च 2022 सकाळचे बातमी अपडेट....
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी जवळ .वारकऱ्यांच्या दिंडीच्या ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने, भीषण अपघातात 4 भाविकांचा मृत्यू झाला, तर 19 जण जखमींपैकी 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहीती मिळाली आहे..
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताची सामन्यावर पकड मजबूत., श्रीलंकेला विजयासाठी 419 धावांची गरज आहे.. तर भारताला 9 विकेट मिळवणं अनिवार्य आहे..
मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांची राज्यात दारूबंदी मोहीम सुरू केली आहे.., भोपाळमधील भेल भागातील दारूच्या दुकानात त्यांनी दगडफेक करून केली तोडफोड,व ट्वीट करून स्वतः माहीती दिली..
इराकमधील अमेरिकेच्या दुतावासाजवळ 12 मिसाईल्सद्वारे हल्ला करण्यात आला. इराणमधील दहशतवादी गटाकडून हा हल्ला झाल्याचा अमेरिकेने आरोप केला आहे..
रशिया- युक्रेन युद्धाचा परिणाम श्रीलंकेत महागाईमुळे गॅसचे दर गगनाला भिडल्याने हजारो बेकरी बंद पडल्या आहेत., ब्रेडच्या एका पॅकेटची किंमत 150 रुपयांवर पोहोचली आहे..
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा 'द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने आतापर्यंत 12.5 कोटींची तुफान कमाई केली आहे. , चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांची ट्विटरवर माहिती दिली आहे...
आफ्रिकन देश कांगोमध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाला... रेल्वे रुळावरुन घसरल्यामुळे अपघातात तब्बल 61 लोकांचा मृत्यू झाला आहे.., तर 52 लोक जखमी झाले आहेत...
फडणवीस पेन ड्राईव्ह प्रकरण विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांच्या जीवाला धोका? चंद्रकांत पाटलांची केंद्राकडे संरक्षणाची मागणी केली आहे....
फ्लिपकार्टचे सचिन बन्सल नवी टेक्नॉलॉजीचा 3,350 कोटी रुपयांचा आयपीओ आणणार आहेत., सेबीकडे प्राथमिक कागदपत्रे दाखल करण्यात आले आहेत..
राज्यात गेल्या 24 तासात 251 कोरोना रुग्णांची नोंद, कोरोनामुळे एकही मृत्यू नाही.; 448 रुग्णांनी कोरोनावर केली मात, राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.02 टक्के वर पोहोचले आहेत..
Comments
Post a Comment