11 मार्च 2022 सकाळचे बातमी अपडेट...
उत्तर प्रदेश झाँकी है, महाराष्ट्र अभी बाकी हैं, अशी पाच राज्यांच्या निकालानंतर भाजपनी घोषणा केली आहे., मुंबई महापालिका जिंकण्याचाही विश्वास आहे..
कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याने रेल्वे मंडळाने बेडरोलवरील बंदी दोन वर्षांनंतर हटवली आहे.., रेल्वे प्रवाशांना रेल्वे प्रवासादरम्यान ब्लॅंकेट, उशी आणि चादर मिळणार आहे..
भाजपने 4 राज्यात घवघवीत यश मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत.., रोड शो मध्ये या अंदाजे चार लाख जण उपस्थीत राहणार आहेत..
अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस युक्रेनच्या शेजारील देश पोलंड आणि रोमानियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत..
इंग्लंडचा क्रिकेटर जोफ्रा आर्चरच्या sweep?! या ट्विटवर 'Yes' असं रिट्वीट करून 'आप'ने विजयाचा आनंद व्यक्त.केला आहे.. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचं वर्चस्व कायम राहील.
बोगस डॉक्टरांना बसणार आळा, राज्यातील ग्रामपंचायत स्तरावरील डॉक्टरांची यादी ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर लावण्यासंबंधी जीआर काढणार असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे..
हृतिक रोशनच्या 'फायटर' सिनेमाची रिलीज डेट जाहीर झाला आहे.. हृतिक रोशनचा हा सिनेमा 28 सप्टेंबर 2022 ला प्रदर्शित होणार आहे..
राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाचा समर्पित आयोगाचा दर्जा केला रद्द, राजकीय आरक्षणाबाबत सांख्यिकी माहिती अहवाल तयार करण्यासाठी नव्याने समर्पित आयोग स्थापन होणार आहे..
भारतात Redmi Watch 2 Lite हा नवीन स्मार्टवॉच लॉन्च झाला आहे., या स्मार्टवॉचमध्ये जीपीएस असून त्याची किंमत 4 हजार 999 रुपये इतकी असणार आहे असेही सांगण्यात आले आहे..
Comments
Post a Comment