09 मार्च 2022 सकाळचे बातमी अपडेट...

09 मार्च 2022 सकाळचे बातमी अपडेट...


  दोन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा पुन्हा सुरू होणार आहे.., येत्या 27 मार्चपासून आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार आहे. अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिली आहे..


  युक्रेन-रशिया युद्ध तसेच इंडोनेशिया सरकारच्या आठमुठ्या धोरणाचा भारतातील खाद्यतेल आयातीला जबर फटका मिळाला आहे.. तेलाच्या दरांत जवळपास 28 ते 35% वाढ झाली आहे..


 पुणे-नाशिक ‘हायस्पीड रेल्वे’ साठी अहमदनगर जिल्ह्यातील 1,930 जमीनमालकांची 285 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे., नुकसान भरपाईसाठी महसूल विभाग व रेल्वे अधिकारी शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत..


 युक्रेन vs रशिया सुमीमध्ये अडकलेले 694 भारतीय विद्यार्थी बसने पोल्टावाला या सुरक्षित स्थळी रवाना झाले आहेत. स्थलांतराचा पहिला टप्पा सुरू झाला आहे.. केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी माहीती दिली आहे.


  महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नियम डावलून ठेकेदाराला वाळूचा ठेका दिला आहे. नोटीस बजावण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने  आदेश दिले आहेत..


  अखिलेश यादव यांचा पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या निकालापूर्वी गंभीर आरोप केले आहेत असे  म्हणाले ज्या भागात भाजपचा पराभव, त्या ठिकाणी EVM ची हेराफेरी सुरू आहे.., वाराणसीला ईव्हीएम घेऊन जात असताना आज एक ट्रक पकडला गेला आहे..


  'द कश्मीर फाइल्स' सिनेमाच्या प्रदर्शनाविरोधातील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.  वादाच्या भोवऱ्यात सापडलेला 'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा 11 मार्चला देशभरात प्रदर्शित करणार आहे.. 


  नैसर्गिक साखरेसह मराठवाडय़ातील संपूर्ण उसाचे गाळप करण्यात यावे असे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साखर आयुक्तांना सूचना देण्यात आली आहे..


 किया इंडियाने ‘MyKia’ हे अ‍ॅप्लिकेशन लाँच केले आहे.. ग्राहकांना चाचणी ड्राइव्हसाठी विनंती, Digi-Connect द्वारे व्हिडिओ सल्ला, कार बुक करणे, बुकिंग-ट्रॅकिंग सेवा यासारख्या अनेक वैशिष्ट्यांचा समावेश यात केला गेला आहे..


                 धन्यवाद....

Comments