07 मार्च 2022 सकाळचे बातमी अपडेट...
युक्रेनमधून आतापर्यंत 15 हजार 920 हून अधिक भारतीय भारतात परतले आहेत.. रोमानिया, पोलंड, हंगेरी, स्लोव्हाकिया आणि मोल्दोव्हा देशांनी मदत केली आहे.
विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत राही सरनोबत, इशा सिंग आणि रिदम सांगवान या भारतीय त्रिकुटाने महिलांच्या 25 मीटर पिस्तूल सांघिक गटात सुवर्णपदकाची कमाई केली आहे.. भारताचे स्पर्धेतील तिसरे सुवर्णपदक पण जिंकले आहे..
उत्तर प्रदेश विधानसभेसाठी सातव्या व शेवटच्या टप्प्यासाठी 54 जागांसाठी आज सोमवारी मतदान झाले आहे.., 613 उमेदवारांचे भवितव्य निश्चित होणार आहे.
पिंपरी चिंचवड मधील बातमी.. फडणवीसांच्या गाडीवर फेकल्या चप्पला, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर भिडले गेलं..
'द बॅटमॅन' या सिनेमाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे., दोन दिवसातच 970 कोटींची कमाई केली आहे..
देशातील हायड्रोजन इंधनावरील पहिली कार दिल्लीत 16 मार्चपासून चालणार आहे.. नंतर ती काही दिवसांत नागपुरात आणणार आहेत.. असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगीतलेले आहे.
भाजपने ईडीची इज्जतच ठेवली नाही, ईडीपेक्षा बिडीची किंमत जास्त आहे.. तपास संस्थांच्या गैरवापरावरून धनजंय मुंडेंनी केली टीका..
राज्यभरात पहिल्या मात्रेचे लसीकरण सुमारे 92 टक्के पूर्ण झाले आहे.., दोन्ही मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण 71 टक्के इतके झाले आहे.., दुसरी मात्रा न घेणाऱ्यांचे प्रमाण सुमारे 1 कोटी 64 लाखांवर पोहोचले आहे..
वॉर्नचा मृत्यू हृदयविकारानेच झाला आहे, खोलीतील फरशी, तसेच आंघोळीच्या टॉवेलवर रक्ताचे डाग सापडले आहेत; थायलंडमधील पोलिसांनी माहीती दिली आहे..
Comments
Post a Comment