04 मार्च 2022 सकाळचे बातमी अपडेट....

 04 मार्च 2022 सकाळचे बातमी अपडेट....


  युक्रेनला भारताने मदत केली आहे.., भारतने बुखारेस्ट एयरपोर्टवर 25 टन मदत सामग्री पाठवली, ज्यामध्ये टेंट-चादरी आणि औषधांचा समावेश केलेला आहे..


  यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मयादेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारनं *ऑपरेशन गंगा* सुरु केलं. याअंतर्गत 5 तारखेपर्यंत 15 हजार नागरिक भारतात आणले जातील... 


  सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय , राज्यांना केवळ मानवी वापरासाठी असलेल्या अल्कोहोल युक्त दारूवर उत्पादन शुल्क आकारण्याचा अधिकार दिला आहे...

 

 मानवी वापराव्यतिरिक्त वापरलया जाणाऱ्या मद्यावर उत्पादन शुल्क आकारण्याचा अधिकार, केंद्रीय विधिमंडळाला आहे. असे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे.. 


 जेईई मेन 2022 परीक्षा अर्ज भरण्याची सुरुवात झाली आहे. jeemain.nta.nic.in यावेबसाईटवर विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता येतील.... तर 31 मार्च अर्जाची शेवटची तारीख असेल. तसेच यावर्षीची परीक्षा दोन सत्रात म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यात आयोजित केली जाईल..


  कोणत्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणशिवाय निवडणुका होणार नाहीत, असे मंत्रिमंडळानं ठरवलं आहे.. अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे....


  युक्रेन रशियाच्या युद्धामुळे भारतातील स्टीलच्या भावात मोठी वाढ झाली आहे.. आधी स्टील 54 हजार रुपये प्रतिटन भाव होते. तर आता 62 हजार पाचशे रुपये झाले आहे..


                  धन्यवाद....

Comments