9 फेब्रुवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट....

 9 फेब्रुवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट....


 15-18 वर्षे वयोगटातील लसीकरणाचा आकडा 5 कोटींच्या पार पोहोचला आहे.. 67 टक्के किशोरवयीन मुलांना मिळालाय लसीचा पहिला डोस देण्यात आले आहे, सरकारने राज्यसभेत हि माहिती दिली..


  भारतीय संघाचा वेस्ट इंडिजविरुद्धच्या आज दुसऱ्या सामन्यासह मालिकेत विजयी आघाडीवर, आज दुपारी 1.30 वाजता स्टार स्पोर्ट्स-1 वाहिनीवर’ थेट प्रक्षेपण सुरु राहणार आहे..


  'रायटिंग विथ फायर’ हा रिंटू थॉमस व सुश्मित घोष दिग्दर्शित माहितीपट 94 व्या ऑस्कर पुरस्कार नामांकनांमध्ये सामील करण्यात आला आहे.. ‘द पॉवर ऑफ डॉग’ या हॉलीवूड चित्रपटाला सर्वाधिक 12 नामांकने मिळाले आहेत..


  विकास पाठक उर्फ हिंदुस्तानी भाऊचा जामीन अर्ज वांद्रे दंडाधिकारी कोर्टानं फेटाळला आहे.. तपास प्राथमिक टप्प्यात असल्यानं जामीनाला मुंबई पोलीसांनी विरोध केला होता..


  ओबीसीसंदर्भात राज्य सरकारनं दिलेला डेटा वैध असल्याचा मागासवर्ग आयोगाचा निष्कर्ष, आता सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेकडे लक्ष वळले आहे..


  चंद्रपूर मध्ये शेतकऱ्याने शोधले सोयाबीनचे नवे वाण, रोगाला बळी न पडता एकरी 17 क्विंटल उत्पादन क्षमता सरकारने 15 वर्षांसाठी दिले उत्पादन,  व्, वितरणाचे अधिकार देण्यात आले..


  अतिवृष्टीमुळे दरड कोसळून नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्यातील तळइये गावाला आर्थिक मदत देण्यात आली आहेत. या गावासह आणखी दोन वाड्यांच्या पुनर्विकासासाठी 13 कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे..


 हिंगणघाट जळीतकांड प्रकरणांत फुलराणीच्या कुटुंबीयांना मिळणार न्याय, आरोपीला फाशी होणार की जन्मठेप हे न्यायाधीशांच्या निर्णयानंतर स्पष्ट होणार आहे.., न्यायालय परिसरात राहणार तगडा बंदोबस्त राहणार आहे..


  पोर्तुगाल स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोची एका अनोख्या विक्रमाला गवसणी घतली आहे.., रोनाल्डोने इन्स्टाग्रामवर तब्बल 40 कोटी फॉलोअर्सचा विक्रमी पल्ला गाठला आहे...


                  धन्यवाद....

Comments