27 फेब्रुवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट...

27 फेब्रुवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट...


  राज्यातील सार्वजनिक रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज मध्ये तृतीयपंथीयांच्या उपचारासाठी स्वतंत्र बेड्स आणि एक वेगळा वार्ड आरक्षित करणार असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे..


 मंत्री बच्चू कडू यांच्यावर फौजदारी कारवाईसाठी राज्यपालांनी परवानगी दिली आहे.. त्यामुळे बच्चू कडूंच्या अडचणी वाढतील असे सांगण्यात येत आहे.. 


 युक्रेनचे राष्ट्रपती व्होदिमर झेलंस्की स्वत: रणांगणात उतरले आहेत.. यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.. ते सैन्याच्या वेशात दिसत आहेत..


  पुणे नाशिक मार्गावर सेमी हायस्पीड दुहेरी रेल्वे प्रकल्प चालू होत आहे.. यामुळे पुणे ते नाशिक हा प्रवास केवळ 1 तास 45 मिनिटांत पूर्ण करता येईल असे सांगण्यात आले आहे. 


  2 मार्चपासून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व बोर्डच्या तसेच सर्व माध्यमाच्या सर्व शाळा पूर्णक्षमतेने सुरु करण्यास मंजुरी प्राप्त झाली आहे...


  रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु असल्यामुळे पुढच्या वर्षापर्यंत सोन्याचे दर वाढतच राहतील.. तसेच युद्ध संपलं तरी सोन्यात तेजी कायम राहणार आहे.  असा अंदाज सोन्या चांदीच्या व्यापारातील तज्ञांनी वर्तवलेला आहे...


                 धन्यवाद.....

Comments