26 फेब्रुवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट..
भारतातील अनेक चित्रपट युक्रेन मध्ये शूट झालेले आहेत.. अजय देवगण आणि ज्युनियर एनटीआर यांचा RRR चित्रपटाची शूटिंगही युक्रेनमध्ये झाली आहे...
BCCI ने शुक्रवारी अधिकृतरित्या IPL च्या 15 व्या सीजनच्या तारखांची घोषणा केली आहे.. यानुसार आयपीएलची सुरुवात 26 मार्चला होणार असंल्यचे सांगितले आहे.. लीगमधील फायनलचा सामना 29 मे रोजी होईल.. त्या दरम्यान यावर्षी पुण्यात 15 मॅचेस होतील असेही सांगण्यात आले आहे..
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ करून देण्यात आली आहे...
महाराष्ट्रातील 1200 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत.. राज्यातल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नंबर आणि ईमेल जाहीर केले आहेत..यामध्ये 02222027990 हा लँडलाईन नंबर आहे.. तर हा 9321587143 मोबाईल क्रमांक आहे.. ,controlroom@maharashtra.gov.in हा ईमेल जाहीर कलेला आहे..
काल सोने चांदीच्या दरात मोठी घसरण पहायला मिळाली आहे..- तसे आज शनिवारी सकाळी सोने 51 हजार 110 रुपये प्रति तोळा झाले आहे.. तर चांदी 65 हजार रुपये किलो झाली आहे...
Comments
Post a Comment