25 फेब्रुवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट.... माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ,बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत:
25 फेब्रुवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट....
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ,बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल करण्यात आला आहे... म्हणून 5 आणि 7 मार्चला हाेणाऱ्या विषयांच्या परीक्षा आता 5 एप्रिल आणि 7 एप्रिलला होतील.. तसे बारावीचे पेपर येत्या 4 मार्च पासून सुरु होतील असे सांगितले आहे..
राज्याचा 'गरीबरथ' अशी ओळख असलेल्या सह्याद्री आणि गोदावरी एक्स्प्रेस कायमस्वरूपी बंद करण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय घेण्यात आला आहे..
शेअरमार्केट अपडेट ..- भारतीय शेअर बाजारातील या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 10 लाख कोटींचे नुकसान झाले आहे.. तर निफ्टी फिफ्टीचे सर्व 50 शेअर्स हे 'रेड झोन 'मध्ये गेलेत अशी बातमी मिळाली आहे..
शेती अपडेट -.. कृषीपंपधारकांनी वीज बिलातील पन्नास टक्के थकबाकी 31 मार्चपर्यंत भरल्यास व उर्वरित 50 टक्के रक्कम माफ होईल असे निर्देश व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी माहिती दिली आहे..
केवळ एकाद्या मंत्र्यावर आरोप झाले किंवा अटक झाली म्हणून त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होत नाही.. अशी माहिती कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी दिली आहे..
व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये इतर सदस्यांनी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास त्याला अॅडमिनला जबाबदार धरता येणार नाही, असा निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे..
Comments
Post a Comment