22 फेब्रुवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट....
राज्यात यावर्षी ऊस लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढल्याने साखरेचे भाव कमी होणार आहे..असे साखर महासंघाच्या अध्यक्षांची माहिती दिलि आहे...
देशातील मोठ्या चारा घोटाळा प्रकरणातील आरोपी लालू प्रसाद यांना काल कोर्टाने पाच वर्षाची शिक्षा सुनावली आहे..
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होऊ लागल्याने येत्या दोन दिवसात निर्बंध शिथिल करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू झाले आहेत्...
यावर्षी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडास्पर्धेतील सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.. असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे..
आरोग्य विभागाच्या भरतीत अनेक घोटाळे पहायला मिळाले आहेत्.. त्यामुळे अनेक चांगल्या विद्यार्थ्यांचे नुस्कान झाले होते..
दरम्यान आता आरोग्य विभागाच्या उर्वरित 50 टक्के जागांसाठी , नवीन परीक्षा पद्धत वापरून लवकरच पदे भरणार असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे..
भारताचा युवा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसनला केलं पराभूत, 39 चालींमध्ये पराभव केल..
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर आहे.., किडनी फक्त 20 टक्के कार्यरत, ब्लड प्रेशरही वाढला आहे.. सोमवारी चारा घोटाळाप्रकरणी न्यायालयाने 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्ष सुनावली आहे..
अनुपम खेर-मिथून चक्रवर्तींच्या 'द कश्मीर फाईल्स'चा ट्रेलर रिलीज झाला आहे.. काश्मीर नरसंहाराच्या कहाणीला मोठ्या पडद्यावर मांडण्यासाठी निर्माते सज्ज, येत्या 11 मार्च रोजी चित्रपट थिएटरमध्ये दाखल होनार् आहे..
सागरी हद्द नियंत्रणाची मर्यादा आता 50 मीटर पर्यंत लागू झाली आहे... सगरी हद्द व्यवस्थापन आराखडय़ास राष्ट्रीय सागरी हद्द व्यवस्थापन प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे..
चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रात 4 वाघांची दहशत, कामगाराचा बळी घेणाऱ्या पट्टेदार वाघाला बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन देऊन काल रात्री पकडण्यात वन विभागाला यश मिळाले आहे..
नांदेडमध्ये विवाह सोहळा उरकून नववधूला घेऊन जात असताना टाटा मॅजिक आणि टेम्पोचा समोरासमोर भीषण अपघात झाला, नववधूसह 6 जणांचा जागीच मृत्यू, तर काही जण जखमी झले..
'कच्चा बदाम' फेम भुबन बड्याकरचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड होत् आहे व्हायरल, कोलकातामधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये स्टेजवर गाणं गात दिला परफॉर्मन्स ...
*Maharashtra Corona Update :* राज्यात सोमवारी 806 नव्या रुग्णांची भर, 2 हजार 696 रुग्ण कोरोनामुक्त; राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.94 टक्के एतकी आहे..
Comments
Post a Comment