19 फेब्रुवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट..

19 फेब्रुवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट...


  एलआयसी पॉलिसी धारकांना एलआयसीच्या आयपीओ मध्ये गुंतवणूक करायची असेल, तर 28 फेब्रुवारीपूर्वी पॉलिसीमध्ये पॅन लिंक करणे आवश्यक आहे असे सांगण्यात आले आहे..


  नारायण राणेंचा खळबळजनक दावा म्हणाले, सुशांतसिंग आणि दिशा सालियनची आत्महत्या नव्हे तर हत्याच, पुन्हा तपास होणार व मातोश्री वरील चौघांविरुद्ध नोटीस तयार केली जाईल असेही ते म्हणाले ...


  आपल्या फाशीची शिक्षा सहसा कोणाला दिली जात नाही , मात्र काल भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी शिक्षा सुनावण्यात आली आहे.. यामध्ये अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटातील 49 दोषींमधून 38 जणांना फाशी देण्यात आली. व 11 जणांना जन्मठेप तर एक आरोपी माफीचा साक्षीदार ठरला आहे...


  औरंगाबाद मध्ये क्रांती चौक मध्ये काल रात्री मोठ्या धुमधडाक्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे.. हा देशातला सर्वात उंच शिवरायांचा पुतळा आहे क्रांती चौकातील जुना पुतळा 39 वर्षांपूर्वी म्हणजेच 1983 च्या काळात उभारण्यात आला होता...


  2020 मध्ये पहिल्या लॉकडाउननंतर रियल इस्टेट सेक्टरमध्ये खूप घसरण झाली होती. मात्र आत. 2021 मध्ये कोविडची दुसरी लाट आल्यानंतर या क्षेत्रात ऐतिहासिक डिमांड आली आहे.. एनारॉक प्रॉपर्टी कंसल्टेंटचे चेअरमन अनुज पुरी यांनी सांगितले. आहे..  यापुढे रियल इस्टेट सेक्टरमध्ये आणखी मागणी वाढणार आहे...


                     धन्यवाद....

Comments