18 फेब्रुवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट...
भारतात पेट्रोल-डिझेलऐवजी हायड्रोजनवर चालणार गाड्या, ऊर्जा मंत्रालयाकडून ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर केले आहे.. हायड्रोजन हे पेट्रोल-डिझेलच्या अडीच पट ऊर्जेचा स्रोत करण्यात आले आहे..
नवी दिल्लीत ओल्ड सीमापुरीमध्ये एका घरात एका संशयास्पद बॅगमध्ये IED आढळल्यामुळे खळबळ उडाली, एनएसजीकडून तपास सुरु आहे.. तेथील 3-4 भाडेकरू फरार आहेत..
एका आठवड्यात दुसऱ्यांदा ट्विटर डाऊन झाल्याने नेटकरी हैराण, गुरूवारी रात्री 11 वाजेनंतर ट्विटर अकाऊंटवरील अपडेट दिसत नसल्याच्या तक्रारी केली आहे..
प्रो-कबड्डी लीगमध्ये यूपी योद्धाने यू मुंबावर 35-28 ने नोंदवला रोमांचक विजय, यूपी योद्धाचा प्लेऑफमध्ये प्रवेश, यू मुंबाचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे..
ठाणे शहापूर तालुक्यातील एका फार्ममध्ये बर्ड फ्लूमुळे काही कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे.., संसर्गाची पुष्टी झाल्यानंतर 23 हजारांहून अधिक कोंबड्यांना मारण्याची तयारी सुरू झाली आहे..
चित्रपट प्रदर्शित करू नका नाहीतर तुमचा जीव जाईल, 'काश्मीर फाइल्स' या चित्रपटाचे दिग्दर्शक 'विवेक अग्निहोत्री यांना धमक्यांचे फोन चित्रपट 11 मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे..
तिरुपतीच्या भगवान व्यंकटेश्वर मंदिराला 9.2 कोटी रुपयांचे मरणोत्तर दान जाहीर, चेन्नईतील 76 वर्षांच्या पार्वतम नावाच्या एका महिलेने तिच्या बहिणीच्या नावाने दान दिलं आहे...
अजय देवगणने इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘दृश्यम 2’ चित्रपटाच्या शुटिंग दरम्यानचा फोटो शेअर केला आहे. अजयसोबत श्रिया सरन, तब्बू पुन्हा मुख्य भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा होत आहे.
देशातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा मुंबई-बेलापूरमध्ये सुरू झाली आहे.. उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबई, महाराष्ट्राला प्राधान्य दिलं त्याबद्दल केंद्र सरकारचे धन्यवाद मानले जात आहे .
Comments
Post a Comment