16 फेब्रुवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट...
राज्यात कोरोनासंख्या आटोक्यात येत आहे.. बुधवारी 2 हजार 748 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे...
देशातील सर्वात मोठी IT कंपनी इन्फोसिसमध्ये तब्बल 55 हजार नवीन लोकांची भरती होणार अस्ल्यचे कंपनीचे सीईओ सलील पारेख यांनी दिली माहिती ....
रिझर्व्ह बँकेत 950 असिस्टंट पदासाठी भरती होत आहे... तसे याविषयीचे सविस्तर जॉब अपडेट आपण पुढे येणाऱ्या मॅसेज मध्ये पाहूय..
8 महिने उलटले तरी आमच्या मागण्यांची अंमलबजावणी नाही. त्यामुळे येत्या 26 फेब्रुवारीपासून आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार असा इशारा संभाजीराजे यांनी दिला आहे...
कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस देणारे देशातील पहिले राज्य गोवा ठरलं आहे.. लवकरच गोवा राज्यातील लसीकरण केंद्र बंद होतील असेही सांगण्यात आले नाही..
एसी लोकल सेवांना अल्प प्रतिसाद मिळत असतानाही.. आता आणखी 34 एसी लोकल फेऱ्या वाढतील. अशी मध्य रेल्वे ची माहिती मिळाली आहे...
दिल्लीत नवीन इलेक्ट्रिक वाहन रूपांतरण धोरण लागू केले जात आहे. या अंतर्गत पेट्रोल आणि डिझेल कारचे इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतर करण्याची सरकारची योजना आहे...
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या निवासस्थानी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास अटक, तो तरुण मूळचा बंगळूरुचा असल्याची माहिती मिळाली आहे..
पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा 6 विकेट्सने विजय, व वेस्ट इंडीजने दिलेले 158 धावांचे लक्ष्य भारताने 162 धावा करत गाठलं, रोहित शर्माच्या 40 धावा करून भारतीय संघ विजयी झाला..
केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या पगारात वाढीव पगार मिळण्याची शक्यता, केंद्र सरकार कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीएमध्ये वाढ करण्याची घोषणा करणार अस्ल्यचे बातमी मिळाली आहे..
दैनंदिन रुग्णसंख्या व चाचण्यांच्या तुलनेत बाधितांच्या प्रमाणाचा आढावा घेऊन कोरोनाचे अतिरिक्त निर्बंध मागे घ्यावेत असे केंद्राच्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सूचना देण्यात आल्या आहेत..
येस बँकेचे संस्थापक राणा कपूर हे होणार आहेत.. गौतम थापर यांच्यासह 09 जणांना जामीन मंजूर कपूर, थापर अन्य प्रकरणांत अटकेत असल्याने कारागृहातून सुटका नाही...
मार्क झुकरबर्गकडून फेसबुकची मूळ कंपनी मेटासाठी नवीन ब्रीदवाक्याची घोषणा करण्यात आली आहे.., आता मेटाचं नवीन ब्रीदवाक्य ‘मेटा, मेटामेट्स मी’ असं असणार आहे..
प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामाचा अंतिम सामना 25 फेब्रुवारीला होणार आहे., तर 21 आणि 23 फेब्रुवारीला ‘प्ले-ऑफ’ म्हणजेच बाद फेरीचे दोन टप्पे पार पडणार आहेत..
शिर्डी विमानतळ ते बाह्यवळण रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी 195 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार राधाकृष्ण विखे यांची माहिती दिली आहे..
Comments
Post a Comment