16 फेब्रुवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट....

16 फेब्रुवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट.....


  भारतीयांना युक्रेन सोडण्याचा सल्ला भारतीय दूतावासाने विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्यास सांगितले; अमेरिका-ब्रिटन यांनी आधीच आपल्या नागरिकांना परत बोलावले आहे..


 वाशिमध्ये लग्न आटोपून परतताना कारची उभा असलेल्या ट्रॅक्टरला झाली धडक त्यात पाच जणांचा मृत्यू झाला, इतर जखमींवर अकोला जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत..


  टेस्ला कंपनीचे (Tesla) सीईओ इलॉन मस्क यांनी टेस्लाचे तब्बल 5.7 अरब डॉलर्स किंमतीचे शेअर्स चॅरिटीला दान केले आहेत, अमेरिकेच्या सेक्युरिटी अँड एक्सचेंज कमिशनची माहिती मिळाली आहे...


  मनसे प्रमुख राज ठाकरे यांना यापुढे आता केवळ 'मराठी हृदयसम्राट' ही पदवी लावावी, व इतर कोणतीही पदवी लावण्याचा उद्योग करु नये  असे मनसेच्या वतीनं आदेश दिले आहे...


  किरीट सोमय्यांचा राऊतांवर पलटवार, म्हणाले- मी संजय राऊतांनी केलेल्या आरोपावर चौकशीसाठी तयार, पण ते कोविड सेंटर घोटाळ्यावर का बोलत नाहीत?


  लखीमपूर हिंसाचारातील आरोपी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा 128 दिवसांनी तुरुंगातून बाहेर आला आहे... उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर जिल्हा न्यायाधीशांनी सुटका करण्याचे आदेश दिले...


  पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचा रस्ते अपघातात मृत्यू, दिल्लीजवळील कुंडली सीमेवर त्यांच्या कारला अपघात .. कारमध्ये त्याची मैत्रिणदेखील होती, तीदेखील अपघातात जखमी झाले..


 हॅकर्सने यूट्यूबवरील संसद टीव्ही चॅनल केलं हॅक, हॅकर्सने नाव बदलून केलं Ethereum असं केलं नाव, मंगळवारी संध्याकाळी हे चॅनल पूर्वरत् सुरु झाल..


  भारतात ई-स्कूटर कंपनी ओकिनावा ऑटोटेकने राजस्थानच्या भिवडी येथे सुरु केला दुसरा प्लांट, सध्या अलवर येथील पहिल्या प्लांटची क्षमता दरवर्षी 1,80,000 युनिट्स इतकी करण्यात् आली आहे...


      धन्यवाद....

Comments