11 फेब्रुवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट....

 11 फेब्रुवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट....


  यावर्षी डेलॉइटने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार, एक तृतीयंशपेक्षा जास्त भारतीय ग्राहकांनी इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रस दाखवला आहे.. म्हणजे साहजिकच भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी जास्त असेल व तसेच या क्षेत्रात करिअरच्या संधी सुद्धा जास्त उपलब्ध असतील असेही सांगण्यात आले आहे..


  एमएचटी-सीईटी 2022 साठी नोंदणीला सुरुवात झाली आहे..  दरम्यान नोंदणी कुठं आणि कशी करायची याविषयी आपण पुढे येणाऱ्या मॅसेज मध्ये जाणून घेऊया...


  गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एअरटेलने मोबाइल आणि इतर सेवांच्या किमती 18 टक्क्यांवरून 25 टक्क्यांपर्यंत वाढवल्या होत्या, यामध्ये पुन्हा दरवाढ निश्चित आहे.. असे कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे..


  नागपूर विभागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना ,परीक्षेसंदर्भात काही अडचण असेल तर विद्यार्थी सकाळी नऊ ते सायंकाळी सात दरम्यान 0712-2565403 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात...


  राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन यंदा मुंबईतच होणार आहे.. असे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे..


  केंद्र सरकारने काल नवीन कोरोना गाईडलाईन्स जारी केले त्यानुसार आता प्रवाशांना RT-PCR ची 72 तासांपूर्वीची टेस्ट अनिवार्य असणार नाही...


  त्याऐवजी प्रवासादरम्यान प्रवासी आता त्यांचे संपूर्ण लसीकरण प्रमाणपत्र दाखवू शकतात  असे केंद्राने स्पस्ट केले आहे..


                         धन्यवाद....

Comments