04 फेब्रुवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट...

 04 फेब्रुवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट...


  राज्य सरकार येत्या 31 मार्चपर्यंत राज्यात 5 लाख घरे बांधणार आहे.. महाआवास योजना 2.0 अभियाना अंतर्गत ही घरे बांधण्यात येतील असे सांगण्यात आले आहे.. 


  या आधीही याच योजने अंतर्गत सरकारने पाच लाख घरे बांधली आहेत.. असे काल ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे..


  गेट 2022 हि परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत होती... मात्र परीक्षा पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार दिल्या असल्याने हि परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार आहे..


 बोर्डाच्या परिक्षा ऑफलाईनच होतील विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आवाहन केले आहे..


  ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार यापेक्षा अधिक संसर्गजन्य आहे सध्या 57 देशांमध्ये हा प्रकार आढळला आहे.. असा जागतिक आराेग्य संघटनेचा इशारा केला आहे...


  काल गुरुवारी 22 कॅरेट सोन्याच्या दरात 600 रुपयांनी वाढ झाली.. तर 24 कॅरेट सोन्याच्या दरात 670 रुपयांनी भाववाढ झाली आहे..


  तसे आज शुक्रवारी सकाळी सोने 49 हजार 650 रुपये प्रति तोळा झाला आहे.. तर चांदी 61 हजार 400 प्रति किलो झाली आहे....


                 धन्यवाद....

Comments