ओमायक्राॅनचा फुफ्फुसाला धोका किती....?

  ओमायक्राॅनचा फुफ्फुसाला धोका किती....?


   कोरोनामुळे आरोग्यावर व् तसेंच त्यात ल्या त्यात फुफ्फुसावर मोठा आघात होतो. त्यात सध्या जगभर कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने धुमाकूळ घातलेला आहे. मग या विषाणूचा फुफ्फुसावर काही परिणाम होतोय का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.


   याबाबत अमेरिका व जपानच्या संशोधकांनी हॅम्स्टर्स आणि उंदरांवर अभ्यास केला आहे. त्यातून मोठा निष्कर्ष समोर आला आहे. कोरोनाच्या तुलनेत ओमायक्रॉन तितकासा गंभीर नाही आहे. कोरोना संक्रमित लोकांच्या फुफ्फुसावर ओमायक्रॉनचा फारसा परिणाम होत नसल्याचे दिसून आलेला आहे.


  ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या उंदरांच्या फुफ्फुसांमध्ये इतर प्रकारांपेक्षा एक दशांश कमी विषाणू होते असे सांगितले आहे.. पूर्वीच्या विषाणूच्या स्ट्रेनच्या तुलनेत 12 फुफ्फुसांच्या नमुन्यांमध्ये ओमायक्रॉन विषाणू खूपच हळूहळू वाढल्याचा निष्कर्ष निघाला आहे.


    फुफ्फुसाला धोका नाही..


 कोरोनाचा ओमायक्रॉन विषाणू फुफ्फुसाच्या बाहेर राहतो. त्यामुळे ओमायक्रॉनचा फुफ्फुसाला तसा धोका होत नाही असे म्हणतात. दक्षिण आफ्रिकेत डेल्टा बाधित रुग्णांपेक्षा ओमायक्रॉनमुळे कमी बळी गेलेत. ही संख्या 80 टक्क्यांपेक्षा कमी आहे असेही सांगण्यात आले आहे.. 


  यूके हेल्थ अँड सेफ्टीच्या तत्सम अभ्यासानुसार, ओमायक्रॉनची जोखीम 70 टक्के कमी असल्याचा अंदाज वर्तवला आहे. मात्र, कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने याबाबत आवश्यक काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे....


                        धन्यवाद....

Comments