7 जानेवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट....
चीनकडून पेगॉंग त्सो लेकवर पुलाचे बांधकाम सुरू केले आहे, पूल अवैध असून देशाच्या हितासाठी आवश्यक ती पाऊले उचलणार असा भारताचा चीनला सज्जड दम........
दुसऱ्या कसोटीत भारताचा दक्षिण आफ्रिकेने 7 गड्यांनी केला पराभव, डीन एल्गरच्या झुंजार आणि नाबाद 96 धावांची खेळी खेळून मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत केली आहे.
बुली बाई ॲप बनवणाऱ्या मुख्य मास्टरमाईंडला आसाममध्ये अटक करण्यात आली आहे, दिल्ली पोलिसांनी नीरज बिष्णोई नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.
केंद्र सरकारने निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवली आहे. लोकसभेसाठी 95 लाख तर विधानसभेसाठी 40 लाख खर्च करता येणार, असे मोठ्या व लहान राज्यांसाठी ही वेगवेगळी असणार आहे..
म्हाडाच्या भरती परीक्षेचे सुधारित वेळापत्रक म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध जाहीर, आता 7 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान म्हाडा प्राधिकरणाची परीक्षा होणार आहे.
लसीकरण झालं असेल तरच जेजुरी गडावर खंडोबा दर्शनासाठी प्रवेश देण्यात येईल, गर्दी रोखण्यासाठी नवीन नियम याआधी त्र्यंबकेश्वरला लागू केलाय हा नियम...
ग्रीन एनर्जी कॉरिडॉरच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी देण्यात आली आहे, भारत-नेपाळला जोडणाऱ्या महाकाली नदीवर बांधणार पूल. केंद्र सरकारचा मोठा निर्णय घेतला आहे.
राज्यात पुढच्या 4,5 दिवसात काही ठिकाणी हलका व काही ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे, विदर्भात तुरळक ठिकाणी 9 जानेवारीला गारपीटीची शक्यता वर्तवली आहे.
पोलिसांसाठी गृह विभागाचा मोठा निर्णय आता 55 वर्षांवरील महाराष्ट्र पोलिसांना ‘वर्क फ्रॉम होम’; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा दिली आहे.
प्रो-कबड्डी अपडेट.. जयपूर पिंक पँथर्सचा 38-31 असा पराभव केला, पाचव्या विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवून बंगळुरू बुल्सच्या पवन सेहरावतची चमकदार कामगिरी बजावली ....
Comments
Post a Comment