31 जानेवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट....

 31 जानेवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट....


  पाचवी ते आठवीच्या शाळा कोरोनामुळे बंद राहिल्या होत्या या कारणाने सात महिन्यांचा कोरडा आहार आता विद्यार्थ्यांना घरपोच दिला जाणार आहे..यामध्ये ऑगस्ट ते फेब्रुवारी दरम्यान राज्यातील 1 कोटी 2 लाख विद्यार्थ्यांना आहार दिला जाणार आहे..


  महाराष्ट्राला केंद्रीय योजनांमध्ये पूर्वी मदत मिळायची तशी मदत मोदी सरकार आल्यापासून मिळत नाहीत असा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आरोप केला आहे. 


  देशात 75% लोक पूर्णपणे व्हॅक्सीनेटेड झाले आहेत.. केंद्रीय आरोग्यमंत्रालयाकदुन् मिळाली माहिती, तर पंतप्रधान मोदींनी याबाबत शुभेच्छा दिल्या आहेत..


  ​​​​​​​कोरोनाची तिसरी लाट ही मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत संपुष्टात येईल असे रज्यचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे..


  दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्याच्या निर्णयासंदर्भात वाट पहा अशी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे..


   राज्यात पुढील  24 तास थंडीची लाट येणार आहे..  तर येत्या काही दिवसांत पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता आहे....  अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे...

 

                       धन्यवाद....

Comments