29 जानेवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट....

 29 जानेवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट....


   अर्थसंकल्पापूर्वीच देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार बदलले आहे, केंद्र सरकारने डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांची देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे...


   इंडियन ऑईलला 51 ठिकाणची तर अदानी ग्रुप ला 50 ठिकाणची सीएनजी डिस्ट्रिब्युशन डीलरशीप, असे महाराष्ट्रातील सर्वाधिक 9 जिल्ह्यांत सीएनजी पुरवण्याचे अधिकार अदानी ग्रुपला मिळाले आहेत.


  ब्रह्मोस क्षेपणास्त्रांसाठी भारताला मिळाली पहिली ऑर्डर, हि भारत फिलीपिन्सला ब्रह्मोस मिसाईल निर्यात करणार, व 374 मिलीयन डॉलर्सचा करार करणार..


  भाजप पुन्हा देशातील श्रीमंत पक्ष झाला आहे.. 2019-20 वर्षात भाजपची घोषित संपत्ती 4 हजार 487 कोटी रुपये पर्यंत पोहोचली आहे.. काँग्रेसला मागे टाकून बसपा दुसऱ्या स्थानी पोहचला आहे...


  वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी श्वेता तिवारीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.., मध्य प्रदेश राज्य सरकारने कारवाई केली आहे.. श्वेताने जाहीर माफी मागण्याचे हिंदूत्ववादी संघटनांची मागणी केली आहे..


  टीव्हीएस मोटर्सची विदेशी ई-बाईक कंपनीत गुंतवणूक करण्यात येत आहे.., 10 कोटी डॉलर्सचा करार करून स्विस ई-मोबिलिटी ग्रुप एजी (SEMG) कंपनीत 75 टक्के हिस्सा घेतला आहे..


  कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा यांची नात सौंदर्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे, तिने 4 महिन्यांपूर्वीच दिला बाळाला जन्म दिला होता असेही सांगितले आहे..


 प्रो कबड्डी. पाटणा पायरेट्सने तामिळ थलायवाजचा 52-24 असा पराभव केला आहे, पाटणाने 12 सामन्यांमध्‍ये आठव्या विजयासह गुणतालिकेत दुसरे मिळवले आहे.. 


   नेटफ्लिक्सवर माधुरी पहिल्यांदाच वेबसिरीजमधून झळकणार अस्ल्यचे चित्र दिसत आहे.. 'द फेम गेम' या वेबसिरीजमधून पहिल्यांदाच ओटीटी प्लॅटफॉर्मद्वारे पदार्पण करणार आहेत..


                     धन्यवाद....

Comments