25 जानेवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट....

 25 जानेवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट....


 1 फेब्रुवारीपासून राज्यात तमाशाला 50 टक्के क्षमतेने परवानगी देण्यात आली आहे....


 आयपीएल मधील नवीन टीम 'लखनऊ' चे नवीन नाव 'लखनऊ सुपरजायंट्स' असे असणार आहे. टीमचे मालक संजीव गोयंका यांनी घोषणा केली..


  कोरोनाची तिसरी लाट आता कमी होत चालली आहे. राज्यात काल दिवसभरात 28 हजार 286 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.


  केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रत्येक योजनाच्या किंवा सेवेचा लाभ घेण्यासाठी आता एकच डिजिटल प्रोफाईल असणार आहे तर येत्या ऑगस्टपासून ही नवीन सेवा सुरू होणार आहे.. या सेवेला ‘सिंगल साईन ऑन’ असे नाव देण्यात आले आहे. ..


  हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार... महाराष्ट्रात पुढील 5 दिवसांत कडाक्याची थंडी पडणार आहे.


  दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी यावर्षी शासकीय रेखाकला परीक्षा ऑनलाईन होणार आहेत. म्हणजे यावर्षी विद्यार्थी कलागुण घेऊ शकतील असेही सांगितले आहे..


  मात्र क्रीडा गुणांसंदर्भात अद्यापही निर्णय झालेला नाही. मागील २ वर्षांत शाळा बंद असल्यामुळें यामध्ये  विद्यार्थ्यांची चूक काय असा प्रश्न विद्यार्थी पालक व क्रीडा शिक्षकांकडूनही होत आहे....


 वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यातल्या वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थी प्रवेश क्षमतेत वाढ करण्याचा निर्णय घेतला..  वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची माहिती दिली आहे..


                       धन्यवाद....

Comments