22 जानेवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट....
हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार 25 जानेवारीपासून राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढणार, आहे.....
महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या प्रात्येक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे..
यानुसार दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा २५ फेब्रुवारी २०२२ पासून सुरु होतील्.. तर बारावीच्या परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्चच्या दरम्यान सुरु होतील...
आरोग्य मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी स्टँडर्ड प्रोटोकॉल लागू केला आहे.. त्यानुसार आता 22 जानेवारीपासून कोरोनाग्रस्त देशातून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी आयसोलेशन सुविधा सक्तीची नसणार असल्याच सांगितलं आहे..
शेअरमार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी अदानी समुहाची प्रमुख कंपनी म्हणजे अदानी विल्मरचा 'आयपीओ' येत्या 27 जानेवारीला खुला होणार आहे...
आधार कार्डबाबत महत्वाची माहिती , यापुढे आपण तयार केलेले स्मार्ट आधार कार्ड उपयोगी ठरणार नाही ते अवैध ठरविण्यात येईल असे यूआडीएआयने स्पष्ट केले आहे..
राज्यात केवळ दहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक राहिला आहे. राज्यातील सर्व रक्तपेढ्यां मिळून केवळ 41 हजार रक्त पिशव्यांचा साठा उपलब्ध आहे....
राज्यात शाळांपाठोपाठ वसतिगृहेही सुरु होतील असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ,धनंजय मुंडे यांचे प्रशासनाला आदेश देण्यात आले आहेत..
Comments
Post a Comment