20 जानेवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट....

 20 जानेवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट....
 

  राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत चढउतार चालूच आहे..  गेल्या २४ तासात राज्यात ४३ हजार ६९७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे... तर २१४ ओमायक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे..


  कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी उड्डाणे 28 फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील असा डीजीसीएचा मोठा निर्णय घेतला आहे....


  १९ जानेवारीपासून नीट यूजी काउंसलिंगसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे.. उमेदवार या ऑनलाइन अर्जांसाठी mcc.nic.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात...


  टाटा मोटर्सने काल बुधवारी आपल्या सीएनजी कार लाँच केल्या आहेत.. कंपनीने आपले Tiago आणि Tigor हे मॉडेल CNG तंत्रज्ञानासह सादर केले आहेत..


  टाटा टियागोच्या एक्सई या मॉडेलची किंमत ६ लाख ९ हजार रुपये इतकी झाली आहे.. तर टिगोरच्या एक्सझेडची किंमत ७ लाख ६९ हजार ९०० रुपये आहे...


   राज्यातील शाळा ,महाविद्यालये सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकार घेईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतच्या प्रस्तावास हिरवा कंदील दाखविला आहे...


  तसेच स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरू होणार असेहि मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले आहे...


   गोव्यात शिवसेना राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी घोषणा केली आहे...


                      धन्यवाद......

Comments