17 जानेवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट....

17 जानेवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट....


  राज्यात 90 टक्के लोकांनां लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.. तर सध्या दररोज 8 लाख लोक लस घेत आहेत.. अशी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे..


   गोव्यात जर आमचं सरकार आलं, आणि प्रत्येकाला रोजगार देणं शक्य झालं नाही, तर बेरोजगारांना तीन हजार रुपये भत्ता देण्यात येईल अशी अरविंद केजरीवाल यांनी घोषणा केली..


 राज्यात प्राणवायूच्या खाटांची मागणी वाढत गेल्यास आणि दैनंदिन वैद्यकीय प्राणवायूची मागणी ७०० मेट्रिक टनांपर्यंत गेल्यास ... राज्यातील निर्बंधांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कठोर निर्णय घेतील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.... 


  MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांच्या ऑनलाईन अर्जाची प्रोसेस तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. काल संध्याकाळी ५ :४० ला आयोगाने आपल्या ट्विटर हॅण्डलवरून ही माहिती दिली आहे...


  विमानाने प्रवास करणे आता महाग होऊ शकते... कारण विमानाचे इंधन म्हणजेच Aviation Turbine Fuel च्या दरात 4.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे... 


  जानेवारी 2022 मधील ही दुसरी वाढ आहे... याआधी 1 जानेवारी रोजी विमान इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली होती...


   तसे तुम्हाला माहिती असेल जेट इंधनाच्या किमती प्रत्येक महिन्याच्या 1 आणि 16 तारखेला अपडेट होत असतात... तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज बदलत असतात...


                       धन्यवाद.....

Comments