13 जानेवारी सकाळचे बातमी अपडेट....

 13 जानेवारी सकाळचे बातमी अपडेट...


   राज्यात बुधवारी दिवसभरात 46 हजार 723 रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल दिवसभरात 86 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे असे सांगितले आहे.


  2013 पासून टीईटीमार्फत भरती झालेल्या राज्यातील सर्व शिक्षकांची प्रमाणपत्रे खरी आहेत किंवा नाही याची पडताळणी होणार असा शिक्षण परिषदेचा निर्णय घेतला आहे..


   गेल्या १५ महिन्यांपासून बंद करण्यात आलेले TV चॅनलचे TRP रेटिंग्ज पुन्हा एकदा सुरू होणार आहे... केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने त्यासंदर्भातले आदेश देण्यात आले आहेत.


  राज्यातील सर्व दुकानांवर फक्त मराठी पाट्या झळकणार आहेत.  काल राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घेतला...


  कोरोनाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुरुवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधनार् आहेत...  

 

 बीडमधील महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या प्रतिभा सांगळे यांना यावर्षीचा मिस महाराष्ट्राचा किताब मिळाला  आहे.


  राज्यातील कोरोनाची परिस्थितीचा आढावा घेता, राज्यातील शाळा आणखी 15 ते 20 दिवस बंदच राहतील  असा निर्णय आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे...

 

                     धन्यवाद....

Comments