08 जानेवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट.....

08 जानेवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट.....


   राज्यातील पुणे, मुंबई आणि ठाणे , या तीन शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव फार वेगाने होत आहे. मुंबईत काल दिवभरात 20 हजार 971 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.


   अमेरिकेत कोरोना वेग खूप जास्त वाढत आहे. 3 जानेवारीला 10 लाख, तर 6 जानेवारीला 7 लाख रुग्णाची नोंद करण्यात आली आहे., यामुळे अमेरिका ची हालत खुप खराब होत चालली आहे.


   ज्यां एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली आहे. त्यांना कामावर घेतले जाणार नाही. तसेच ज्यांच्यावर कारवाई झाली नाही. त्यांनी कामावर यावे त्यानंतरच चर्चा करणार् अस्ल्यचे काल परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे....


   MG Hector या कारचे पेट्रोल व्हेरिएंट मध्ये 45 हजार रुपयांनी महाग , तर डिझेल व्हेरिएंट 50,000 ते 70,000 रुपयांनी महाग झाले आहे...


   दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने शक्य नसल्या कारणाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळानी ऑफलाईन परीक्षांची तयारी सुरु केली आहे....


   आम्ही स्पष्टपणे ठरवलेलं आहे की 700 मेट्रिक टन ऑक्सिजन, किंवा 40 टक्के बेड वापरले जातील त्यावेळी लॉकडाऊन पूर्ण लागेल. असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनि माहिती दिली आहे.


  कोरोनाची नवीन गाईडलाईन प्रमाणे  लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी आयसोलेशनचा कालावधी आता 14 ऐवजी 7 दिवसांचा असेल असे म्हटले आहे.


ओमायक्रॉन व्हेरिएंटला हलक्यात घेऊ देऊ नका , यातून लोकांचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो... असे जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे.


                     धन्यवाद....

Comments