06 जानेवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट....
राजधानी मुंबईत काल कोरोनाचे काल तब्बल 15 हजार 166 नवे रुग्ण आढळून आले आहेत.. मुंबईची वाटचाल आता लॉकडाऊनच्या दिशेनं सुरु झाली आहे.
उदय सामंत यांनी घेतलेल्या निर्णयानंतर, आता राज्यातील अकृषी विद्यापीठे, अभिमत, स्वयं विद्यापीठे, तंत्रनिकेतन, तसेच शैक्षणिक संस्था 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील असें सांगण्यात आले आहे.तर याकाळात पूर्वीप्रमाणे ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार आहे. तसेच सर्व परीक्षाही ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार अशी घोषणा त्यांनी केली....
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने, नवे कोरोना निर्बंध लद्न्यत्, येत आहेत त्यामुळे UPSC ची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी केली जात होती...
मात्र, यूपीएससची मुख्य परीक्षा वेळापत्रका नुसारच होणार.. असे काल बुधवारी आयोगाने जाहीर केले आहे.
टीईटी परीक्षा घोटाळामुळे , फेब्रुवारी 2013 नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्व शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी होणार असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने निर्णय घेन्यचे ठरवले आहे.
राज्यात दैनंदिन कोरोना रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे., बुधवारी तब्बल 26 हजार 538 रुग्णांची नोंद झाली आहे... तर मृत्यूदर 2.09 टक्के इतका झाला आहे.....
हवामान विभागाने राज्यात 6 ते 9 जानेवारी दरम्यान पावसाची शक्यता वर्तवली आहे ..
Comments
Post a Comment