01 फेब्रुवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट...
ओमायक्राॅनची लाट नियंत्रणात आल्यानंतर आज 1 फेब्रुवारीपासून राज्यात नवीन नियमावली जाहीर झाली आहे...
दहावी बारावीच्या परिक्षा ऑफलाईन नकोत परीक्षा केवळ ऑनलाईन घ्यावी अश्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी काल राज्यभर आंदोलन केले आहे..
राज्यातील स्कॉलरशिप योजनासाठी डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत पुन्हा मुदतवाढ करून देण्यात आली आहे.. अशी माहिती मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे..
महाराष्ट्र शासनाने उत्पादन शुल्कात वाढ केल्याय्मुळे महाराष्ट्रातील रेस्टॉरेंट आणि बार मालकांवर याचे परिणाम होतील असे दिसून येत आहे..
RRR या चित्रपटाची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट 25 मार्च 2022 रोजी सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
निवडणूक रॅलीच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. आता पक्षांना एक हजार लोकांसह रॅली करता येणार, तसेच इनडोअर मीटिंगची मर्यादा 500 पर्यंत असणार आहे...
आज 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमण वर्ष 2022-23 साठी आर्थिक बजेट सादर करणार अशी बातमी दिली आहे..-
Comments
Post a Comment