,सकाळचे बातमी अपडेट ,०९ डिसेंबर
रिझर्व्ह बँकेकडून काल पतधोरण जाहीर झालेला आहे , सलग 9 व्यांदा व्याज दरात बदल झाला नाही , त्यामुळे आता रेपो रेट सध्या 4 टक्क्यांवर कायम आहे, असे सांगण्यात आले आहे.
राज्यातील Bsc आणि Msc च्या विद्यार्थ्यांना सरकारकडून इंटर्नशिप मिळणार असल्यचि बातमी मिळाली आहे, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय झाला आहे, तर हि इंटर्नशिप कशी असणार ,याविषयी आपल्यला लवकरच् समजेल.
दुःख द् घटना: तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळून सीडीएस बिपीन रावत यांचा मृत्यू झाला आहे. तसेंच या अपघातात त्यांच्या पत्नीसह एकूण 13 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे.
शेती अपडेट - गेल्या 10 दिवसांपासून सोयाबीनच्या दरात घट होत होती मात्र आता केंद्र सरकारनेही सोयापेंडची आयात होणार नाही असे स्पष्ट केल्यामुले सोयाबीनच्या दरात आणखी वाढ होणार सांगीतले आहे.
ओमायक्रॉनचा झपाट्याने प्रसार होण्याची शक्यता असल्याचे समजल्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवा असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनि केलेलं आहे.
काल बुधवारी सोन्याच्या भावाततेजी पाहायला मिळाली आहे. तर चांदीच्या किमतीत 1 हजार 112 रुपये प्रति किलोग्रामची घसरण झाली अस्ल्यचे समजले आहे.
तसे आज गुरुवारी सकाळी - सोने 47 हजार 840 रुपये प्रति तोळा झाले , तर चांदी 61 हजार 900 रुपये प्रति किलो झाली आहे. असे समजले आहे.
Comments
Post a Comment