विद्यार्थ्यांना अवकाश संशोधनाची संधी, 'इस्रो'ने मोफत कोर्स सुरु केलाय..!
गुढ अवकाशाबद्दल अनेकांच्या मनात एक कुतुहल असते.. 'इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन' (इस्रो) या अवकाशाबद्दल सतत नवनवीन संशोधन करीत असते. मात्र, अवकाश संशोधनाची आवड असणाऱ्यांसाठी आता 'इस्रो'ने खास अभ्यासक्रम सुरु केलेल
वैज्ञानिक संशोधनात रस असेल, या क्षेत्रात करियर करण्याची इच्छा असल्यास 'इस्रो' अशा विद्यार्थ्यांसाठी 'फ्री सर्टिफिकेशन कोर्स' सुरु केला आहे...
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग (IIRS), डेहराडूनद्वारे 'इस्रो'ने 3 नवीन व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. हा कोर्स करण्यासाठी 'आयआयआरएस'च्या वेबसाइटवरति नोंदणी करावी लागेल. त्यासाठी कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाही. तिन्ही अभ्यासक्रम मोफत आहेत. असेही सांगितले आहे.
अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. या ऑनलाइन कोर्ससाठीचा प्रत्येक अभ्यासक्रम वेगवेगळ्या कालावधीत विभाग्न्यत् आला आहे, जो 4 ते 12 दिवसांचा असेल, त्यामुळे प्रत्येकाला या कोर्समध्ये शिक्षण घेण्याची संधी आहे. असेही सांगितले जाते..
असा करा अर्ज...
' इस्रो'च्या मोफत ऑनलाइन कोर्समध्ये सहभागी होण्यासाठी 'इस्रो' किंवा 'आयआयआरएस'च्या वेबसाइटवर नोंदणी करावी असे सांगितले आहे. नोंदणी करताना पूर्ण नाव, 10वीची गुणपत्रिका अपलोड करावी लागतील. अर्ज भरताना कोर्स निवडावा लागणार आहे..
अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना ई-क्लास पोर्टलद्वारे 70% सत्रांमध्ये उपस्थित राहावे लागणार आहे. असेही त्यांनी सांगितले.
Comments
Post a Comment