राज्यात गारठा वाढणार, थंडीसाठी अनुकूल वातावरण..!

   राज्यात गारठा वाढणार, थंडीसाठी अनुकूल वातावरण..!


   राज्यात गुलाबी थंडीसाठी अनुकूल वातावरण झालेले आहे. त्यामुळे पुढील चार-पाच दिवसांत रात्रीचे तापमान सरासरीच्या खाली जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. रात्रीच्या किमान तापमानात 3 ते 5 अंश सेल्सिअसपर्यंत घट होऊ शकते असेही हवामान विभागाकडून माहिती मिळाली आहे.


   सध्या उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीची लाट आलेली आहे. व् त्याचा परिणाम महाराष्ट्रातही दिसू शकतो असेही सांगितले आहे.. सध्या ढगाळ वातावरण निवळले असून, उत्तरेकडून थंड वाऱ्यांचा प्रवाह सुरु झालेला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत महाराष्ट्रात कडाक्याची थंडी जाणवणार असल्याचे हवामान विभागाकडून कळविण्यात आले आहे.


   येत्या चार दिवसांत रात्रीच्या तापमानात 4 ते 5 अंशाने घट होण्याची शक्यता हवामान विभागाने सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांना थंडीच आनंद घेता येणार आहे.


रुग्णांनी काळजी घ्यावी

  हिवाळ्यात तापमान घसरल्यावर सर्दी व् खोकला यांसारखे संसर्गजन्य आजार वाढतात. तसेंच सांधेदुखी, श्‍वसनाचे विकार, दमा, ऍलर्जी, जुन्या दम्याचा त्रास जाणवण्याची शक्यता असते. म्हणून रुग्णांनि सगळ्यात जास्ती काळजी घेणे मह्तवचे आहे.

                   धन्यवाद....

Comments