30 डिसेंबर 2021 सकाळचे बातमी अपडेट..
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला आलं मोठं यश, बुधवारी कुलगाम येथे सुरक्षा दलाने तीन अज्ञात दहशतवाद्यांचा खात्मा केला.
कसोटी क्रिकेट अपडेट: दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या 4 बाद 94 धावा झाल्या, (डीन एल्गर खेळत आहे 37) तर भारताचा दुसरा डाव 174 धावांतच आटोपला गेला.
महाराष्ट्रात काल 3 हजार 900 कोरोना रूग्णांची नोंद झल्यछि बातमी. ओमिक्रॉन 85 नवीन रुग्ण आढळले; मुख्यमंत्र्यांनी तातडीने बोलावली कोविड टास्क फोर्सची बैठक ...
बजाज ऑटो लिमिटेड पुण्यातील आकुर्डी येथे नवीन इलेक्ट्रिक वाहन प्रकल्पासाठी 300 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार अस्ल्यचि बातमी 5 लाख इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करण्याची योजना आखली जात आहे.
बीड जिल्हावासियांचे स्वप्न अखेर पूर्णत्वास आले.; अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गावरील अहमदनगर ते आष्टीपर्यंत बुधवारी 12 डब्यांची रेल्वेची चाचणी करण्यात आली.
कोल्हापूरकरांना मोठा दिलासा! 18 फुटांवर अडकलेला राधानगरी धरणाचा दरवाजा अखेर बंद, जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.
खो-खो अल्टिमेट लीगचे पुढील वर्षी 4 ते 26 जूनदरम्यान पहिले पर्व रंगणार आहे., भारतीय खो-खो महासंघाचे सरचिटणीस महेंद्रसिंह त्यागी यांनी केलं जाहीर...
अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम करताना अडथळा ठरणारे 2 लाखांहून अधिक झाडे तोडण्यात येणार आहेत., महाराष्ट्रातील 90 हजार झाडांचाही समावेश झालेला आहे.
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी ते आखाडा बाळापूर मार्गावर खासगी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू, 24 जखमी झाल्यचि बातमी..
मुंबईच्या रणजी संघाची घोषणा: मुंबईच्या संघात यावेळी सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला संधी, मुंबईच्या संघाचे नेतृत्व यावेळी पृथ्वी शॉ याच्याकडे कर्न्यत् आले.
Comments
Post a Comment