2 मिनिटांत वाचा महत्वाच्या बातम्या...
ब्रेकिंग अपडेट: महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर 'शाई हल्ला' झाला. एका महामेळाव्या दरम्यान कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी दीपक दळवी यांच्यावर काळी शाई फेकून केला हल्ला; महाराष्ट्र एकीकरण समितीने नोंदवला निषेध, मराठी भाषकांच्या वतीने उद्या मंगळवारी बेळगाव बंदचे आयोजन करण्यात आले आहे.
देशात ओमिक्रॉनचे एकूण 38 रुग्ण सापडले आहेत. या 38 रुग्णांपैकी उपचारांनंतर 20 बरे होऊन घरी परतले, व् उर्वरित 18 रुग्णांपैकी कोणालाही गंभीर लक्षणे नाहीत असे आढळून आले, ओमिक्रॉन संसर्गित रुग्ण आढळणाऱ्या राज्यांची संख्या आता 8 वर जाऊन पोहोचलि आहे.
म्हाडा पेपरफुटी प्रकरण मूळे वातावरण तापलं आहे. म्हाडा भरती पेपर फुटी प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर अभाविपची निदर्शने आढळून आली आहेत, पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात; रविवारी अचानक परीक्षा रद्द झाली होती.
सेन्सेक्सची आज दमदार सुरुवात झाली. बाजार सुरू झाल्यानंतर काही वेळेतच सेन्सेक्स 360 अंकांनी वधारला. सेन्सेक्सने 59 हजारांचा आकडा ओलांडला आहे; निफ्टीने 17,580 च्या आसपास ट्रे़ड करत जवळपास 100 अंकांने उसळन् घेतली होती .
सोने व चांदीचे आजचे दर
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,770रुपये झाली आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 47,770 प्रति 10 ग्रॅम झाली आहे.
पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,270 झालेला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 49,570 रुपये असेल असे सांगण्यात आले आहे.
नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,770 झाला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 47,770 रुपये इतका झालेला आहे.
चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 612 रुपये इतका झाला आहे.
Comments
Post a Comment