26 डिसेंबर 2021 सकाळचे बातमी अपडेट

  26 डिसेंबर 2021 सकाळचे बातमी अपडेट


    राज्यातील शाळा सुरूच् राहतील तसेंच, शाळा बंद करण्याबाबत कुठलाही नवीन निर्णय घेण्यात येणार नसल्याची बातमी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 


    शिर्डीच्या साईबाबा मंदिरात दर्शनाच्या नियमावलीमध्ये झाले बदल , भक्तांना पहाटे 6 ते रात्री 9 पर्यंतच दर्शन घेता असे  मंदिर प्रशासनानी माहिती दिली आहे.


    केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरी भागांमध्ये एक लाख घरे बांधण्यास मंजुरी मिळाली आहे या  निर्णया विषयी सविस्तर आपण पुढे येणाऱ्या मॅसेज नुसार बघू.


   शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी अपडेट ,पीककर्ज योजनेच्या अंमलबजावणीसाठी तालुका स्तरावर देखरेख समिती स्थापन हाेणार असल्यची मागणी विधानसभेत  मंजूर होणार.


    महाराष्ट्रातील ओमिक्रॉन तसेच कोरोना रुग्णांची संख्या वाढतच् आहे. सध्या ओमिक्रॉन बाधितांची संख्या 110 वर पोहोचली गेली आहे.


राज्यात तिसरी लाट आली तर ती ओमायक्रॉनची असेल असे सांगितले आहे., अशा परिस्थितीत ऑक्सिजनची मागणी वाढवण्यात् आली आहे. ,तसेच लॉकडाऊन लागणार यात काही शंका नाही असेही आराेग्यमंत्री राजेश टाेपे यांनी सांगीतल आहे.


   पुण्यात नवीन नियमावली लागू झाली आहे. , जिम, रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये 50 टक्के उपस्थितीत चालू राहतील असा  जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचा आदेश आला आहे.


   एखाद्या पुरुषाने महिलेच्या संमतीशिवाय महिलेच्या शरीराला हात लावणे, हा स्त्रीचा अपमान आहे, तसेच विनयभंगाचा गुन्हा देखील होऊ शकतो. मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा  निर्णय ...


Comments