24 डिसेंबर 2021, सकाळचे बातमी अपडेट


     24 डिसेंबर 2021, सकाळचे बातमी अपडेट..


   डेबिट कार्ड किंवा, क्रेडिट कार्ड टोकनायझेशनसंबंधी निर्णय आरबीआयने 6 महिने पुढे ढकलला असल्याची माहिती मिळाली आहे; 1 जानेवारीपासून नव्हे तर आता जून 2022 पासून लागू होणार शर्ती.


   नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवे निर्बंध लागण्याची शक्यता आली आहे, असा निर्णय टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री यांच्यातील बैठकीत चर्च नुसार समोर आला आहे.


   भारताचा 'पेबल्स' हा चित्रपट 'ऑस्कर'मधून बाहेर काढण्यात आला आहे: अंतिम यादीत प्रवेश नाहीच मिळाला; भारताला ऑस्करसाठी प्रतिक्षा करावी लागणार असल्याचि माहिती मिळाली आहे.


   नाताळसाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर करण्यात आली आहे.; मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने सण साजरे करण्याचे जनतेला आवाहन केले आहे.


   थरारक बातमी! काल झालेल्या सामन्यात शेवटच्या काही सेकंदात पटणा पायरेट्सचा विजय झाला आहे.; हरियाणाला 3 गुणांनी केलं पराभूत करून पाटणा पय्रेत्स् ने बाजी मारली आहे.


   महाराष्ट्रात काल दिवसभरात ओमिक्रॉनचे 23 नवे रुग्ण आढळले आहेत, पुण्यात सर्वाधिक 13 रुग्ण तर मुंबईत 5 रुग्णांची नोंद झाल्यची बातमी मिललै आहे.


   स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार न दिल्यास होणार कोंडी असे, उमेदवाराचं क्राइम रेकॉर्ड जनतेसमोर ठेवावं लागणार असेल; गोव्यामधील राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाचा दणका मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे.


  मध्यप्रदेशात काल रात्रीपासून नाईट कर्फ्यू जरी करण्यात आला आहे., रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत लागू राहणार निर्बंध असे सांगितले आहे.; कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.


  पेपर फुटी प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी न्यायालयात जाणार आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षाच्या कारभारावर टिका करून सांगितले आहे.


  ऐनवेळी होणाऱ्या कॅब राईडच्या कॅन्सलपासून प्रवाशांची सुटका होणार असेल असे म्हंटले जाते. ओला प्लॅटफॉर्मवर कॅब बुक करतानाच तुमचे लोकेशन व पेमेंट मोडचीही माहीती घेतली जाणार अस्ल्यचि माहिती सरकारने दिली आहे.


Comments