20 डिसेंबर 2021 सकाळचे बातमी अपडेट....

       20 डिसेंबर 2021 सकाळचे बातमी अपडेट....


    मध्य अमेरिकन देश ग्वाटेमाला येथे जमीन आणि पाण्यावरून हिंसाचार सुरुच् आहे , आतापर्यन्त लहान मुलांसह 13 जणांचा मृत्यू झाला आहे; पाण्याचा आणि जमिनीचा वाद खूप जुना असल्याचे समजले जाते.


   क्रिकेट अपडेट: अंडर 19 विश्वचषकासाठी बीसीसीआयकडून भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे; हा विश्वचषक वेस्ट इंडिजमध्ये 14 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2022 या दरम्यान खेळाला जाणार आहे.


   पंजाबमध्ये धार्मिक अवमानाच्या संशयावरून दोघांची हत्या करण्यात आली आहे; सुवर्णमंदिर आणि कपूरथळा येथील घटनांवरून, वातावरण तणावपूर्ण झालेला आहे.


   सायबर गुन्हेगारांना बनावट संकेतस्थळे बनवून देणाऱ्या पुण्याच्या सुग्रीव यादव या वेब डिझायनरला अटक करण्यात आली आहे, माटुंगा पोलिसांनी केली कारवाई.


   आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेमध्ये अखेरच्या साखळी सामन्यात जपानचा 6-0 असा धुव्वा उडवत भारत गुणतालिकेत टॉपवर पोहोचला आहे.


   क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत गेल्या 6 महिन्यांत विशेष वाढ झाली आहे, एकूण गुंतवणूक पोर्टफोलिओच्या 10 टक्के क्रिप्टोत करण्याचा भारतीयांचा कल असेल्.


   गणपतीपुळेच्या समुद्रात 5 जण बुडाले व् 4 जणांना वाचवण्यात यश आले आहेत,तर एकाचा मृत्यू झाला आहे; गणपतीपुळे येथे फिरायला गेलेल्या या पर्यटकांसोबत काल सायंकाळी हि घटना घडली.


   केरळमध्ये एसडीपीआय नेत्याच्या हत्येनंतर भाजप नेत्याचा खून खून करण्यात आला. आलप्पुळा जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश; जवळपास 50 जण घेतले ताब्यात.


  वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप उपडेट: किदांबी श्रीकांतचा सिंगापूरच्या लोह कीन येवने 21-15, 22-20 असा केला पराभव, श्रीकांत सिल्व्हर मेडल जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे.


  अभिनेता अल्लु अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा 'पुष्पा' सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ झाला, पहिल्याच दिवशी जगभरात 50 कोटी रुपयांचा झाला गोळा.


                    धन्यवाद....

Comments