16 डिसेंबर 2021, सकाळचे बातमी अपडेट...
राज्यात ओमिक्रॉनच्या आणखी 4 रुग्णांची नोंद झाली., उस्मानाबादमध्ये 2 तर बुलढाणा आणि मुंबईत प्रत्येकी 1 रुग्ण सापडले आहेत; राज्यातील एकूण ओमिक्रॉनबाधितांची संख्या 32 वर जाऊन पोहोचलि आहे....
राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुंची नियुक्ती आता थेट राज्यपाल करू शकणार नाही, कायद्यातील बदलास राज्य मंत्रिमंडळानि दिली मंजुरी.
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका जाहीर. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश जाहीर; तर ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक होऊ नये, असा मंत्रिमंडळाचा ठराव निवडणूक आयोगाकडे जाणार आहे.
बीड दौऱ्याआधी भाजप नेते किरीट सोमय्यांना धमकीचे मेसेज आले, धनंजय मुंडेंविरोधात ईडीकडे तक्रार केली जाणार. सोशल मिडियावरुन दिली आहे माहिती.
कांद्याचे भाव: बुधवारी लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सरासरी 2101 तर नवीन लाल कांद्याला 2 हजार रुपये भाव मिळत आहे.
मुंगूसाच्या केसांपासून बनवलेले रंगकामाचे 1 हजार 735 ब्रश जप्त करण्यात आले आहेत, पोलिसांनी विक्री करणाऱ्या पाच जणांना घेतलं ताब्यात, कराड व मलकापूर येथे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
आत्महत्या केलेल्या स्वप्निल लोणकरची प्रशासनाकडून थट्टा करण्यात आली, 6 महिने उलटल्यानंतरही मुलाखतीसाठीच्या उमेदवारांच्या यादीत मृत स्वप्निलचं नाव आलं आहे.
हॉकी: आघाडीपटू दिलप्रीत सिंगने साकारलेल्या हॅट्ट्रिक, भारताने चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत दुसऱ्या साखळी सामन्यात बांगलादेशचा 9-0 ने उडवला धुव्वा .....
कुख्यात गुंड सुरेश पुजारी फिलिपिन्समध्ये अटक झाल्यानंतर एटीएसच्या ताब्यत आला आहे. ठाणे न्यायालयाने पुजारी याला 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
आर्यन खानला आता प्रत्येक शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजर राहण्याची गरज नाही, मात्र एसआयटीने बोलावल्यावर दिल्लीत जावे लागेल असेही सांगण्यात आले.
एंजल वनची दैनंदिन उलाढाल 7,217 अब्जांवर गेली आहे., ग्राहकांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 146.2 टक्के वाढ होऊन कंपनी 7.32 मिलियन्स ग्राहकांपर्यंत विस्तारली गेली.
Comments
Post a Comment