11 डिसेंबर 2021, सकाळचे बातमी अपडेट,

  11 डिसेंबर 2021, सकाळचे बातमी अपडेट,

    

   13 तारखेपर्यंत म्हणजेच,  सोमवारपर्यंत जे एसटी कर्मचारी कामावर येतील त्यांचं निलंबन मागं घेउन त्यांना कामावर घेतले जाईल अशे परिवहन मंत्री अनिल परब यांनि सांगितले आहे.

   

    राज्यातील महापालिकांचे हद्दीत येणाऱ्या शाळा व व्महाविद्यालये सुरु करण्याबाबत 15 डिसेंबरनंतर राज्य सरकारच्या पातळीवर निर्णय घेण्यात येणार आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली.

 

    मुंबईतील धारावीत या ठिकाणी ओमायक्रॉनचा शिरकाव झालेला आहे. पूर्व आफ्रिकेतील टांझानिया येथून आलेल्या एका व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झल्यचे समजून आले आहे.

 

     राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळत असले तरी, सध्या कोणतेही नवीन निर्बंध लावले जाणार नाही असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  स्पष्टीकरण दिलं आहे.


   विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी होणार आहे. चार् विषयांसाठी एका असा महत्वपूर्न् निर्णय राज्याच्या शिक्षण विभागने घेेेेेेतलेला आहे.


   आचारसंहिता संपल्यानंतर एमपीएससी च्या परीक्षेसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना वाढीव संधी देण्याचा निर्णय शासन काढणार आहे.; असे  सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले आहे.


   ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरातील शाळा सुरु करण्याचा निर्णय पुन्हा लांबणीवरच् ठेवण्यात आला आहे., महापालिका उपायुक्त संतोष टेंगळे यांनी माहिती दिली.


   देशभरात मागील 24 तासांत 9 हजार 419 नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून; तर देशभरात 94 हजार 742 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु  आहेत अशी बातमी आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.

   

 एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कुटुंबियांबाबत यापुढे कोणतेही विधान करणार नाही असे , अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई उच्य न्यायालयात हमी दिली आहे.

                       

                         धन्यवाद... 

Comments