08 डिसेंबर , सकाळचे बातमी अपडेट

        08 डिसेंबर , सकाळचे बातमी अपडेट



   कोरोना योद्ध्यांना बुस्टर डोस द्यावा, असे राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र सादर करण्यात आले. 


    पेटीएम ने आज विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी फ्लाइट बुकिंग तिकिटावर विशेष सूट जाहीर केली आहे. यानुसार इंडिगो, गो एअर, स्पाईसजेट आणि एअरएशियावरील बुकिंगवर विशेष सुट दिल्ली जाईल. 


   त्यांना विमान तिकिटाच्या भाड्यात 15 ते 50 टक्के सूट मिळेल असेही संगीत ले जाते. यासोबतच विद्यार्थ्यांना 10 किलोपर्यंतच्या अतिरिक्त सामानाचाही लाभ मिळणार असल्याचे दिसून येत आहे. 


   ओमिक्रॅानचे सर्वाधिक रुग्न हे महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्याअनुशंगाने आता स्थानिक पातळीवरही प्रशासन सावधानी बाळगत आहे. 


   लातूर मध्ये नवा नियम लागू झाला असल्याचे कळते आहे, त्यानुसार प्रवास करणाऱ्या प्रवाशाला मास्क नसेल , तर वाहनचालकालाही दंड आकारला जाईल असे नियम लागू करण्यात आले आहेत. 


 राज्यातील सर्व महापालिका हद्दीतील इमारतींची उंची कमी होण्याची होणार - जानेवारी महिन्यापासून नवा नियम लागू होणार - याविषयी आपण पुढे येणाऱ्या मॅसेज मध्ये जाणून घेऊ 


    भारतीय जवानांच्या हाती आली नवीनच ताकद जानून घ्या, भारत-रशिया करारातून AK-203 Assault Rifles ची भारतात निर्मिती ला सुरुवात ; पुतिन यांचे भारत दौऱ्यात 10 मोठे करार केले. 

   
   सरकार 'वर्क फ्रॉम होम'बाबत नियम बनवण्याच्या तयारीत , कर्मचाऱ्यांना घरातील संसाधने वापरण्याचा अतिरिक्त खर्च त्यांना मिळणार असेल अस् संगीतल जात. 

   
   राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू, साखर कारखान्याच्या व्यवहारात त्यांनच्यावर घोटाळ्याचा संशय  घेण्यात आला आहे. 

   
   राज्य सरकारने केलेल्या घोषणेनुसार 41 टक्के पगारवाढ झालेली आहे. कामावर हजर झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे पगार खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 

  
   आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी जागांच्या निवडणुकीला स्थगिती करण्यात आली आहे, असा राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय घेण्यात आला. 

  
   इंजिनिअरिंग प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. शिक्षणविभागाच्या या निर्णयाने विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 

  
   इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनचा मोठा निर्णय, खासगी कंपन्यांना लवकरच मिळणार थीम आधारित रेल्वे चालवण्याची परवानगी दिली जाणार. 

   
     क्रिप्टो गुंतवणूक लपविली तर 20 कोटींचा दंड होऊ शकतो, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत राहिल. 
 

    जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना यावर्षीचा 'गदिमा पुरस्कार' जाहीर करण्यात आल आहे., 14 डिसेंबरला पुण्यात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार असे संगीत ले आहे. 

   
   जर्मनीची लक्झरी कार उत्पादक कंपनी ऑडीनं आपल्या Audi A4 चं नवं प्रीमिअम व्हर्जन लूँच केल असेही म्हटले. 

               धन्यवाद..... 

Comments