03 डिसेंबर / सकाळचे बातमी अपडेट

     03 डिसेंबर / सकाळचे बातमी अपडेट


      राज्यातील कोरोनामध्ये अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावीचे परीक्षा शुल्क माफ होणार्  असल्याची बातमी शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी याविषयी  माहिती दिली. तर 2022 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय लागू असेल असेही त्यांनी सांगितले. 


    कर्नाटक राज्यात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळून आले आहेत.- हा नवा प्रकार खूप वेगाने पसरत असल्याने , महाराष्ट्राला सुद्धा यापासून धोका निर्माण होऊ शकतो असे सांगितले जाते.


   गुरुवारी सोयाबीनच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली -  आवक कमी असल्याने सोयाबीनचे दर 6 हजार 600 वर गेले होते - मात्र सोयापेंड आयातीचा मुद्दा समोर येत असल्याने आणखी घट होण्याची शक्यता दिसून येत आहे.


   देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण आढळत असले, तरी आत्ताच लॉकडाऊन लावण्याची गरज नाही. असे नीती आयोगाचे आरोग्य सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले आहे.


   एसटी कर्मचाऱ्यांना नवीन वेतनवाढ लागू झाली असून. व्आता एसटी कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याचे वेतन - हे नवीन वेतनवाढीनुसार मिळेल असें सांगितले आहे.

    

   देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला, अभिवादन करण्यासाठी रायगडवर येत असल्याने!, त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून 7 डिसेंबरपर्यंत पर्यटकांना रायगडावर प्रवेशबंदी असेल असेही म्हंटले आहे.


   एसटी कर्मचाऱ्यांना तीन टक्के वार्षिक वेतनवाढ, 28 टक्के महागाई भत्ता आणि 10 तारखेला पगार; राज्य सरकारन्रे केले परिपत्रक जाहीर.


   ओमिक्रॉनचा एक रुग्ण दक्षिण आफ्रिकन नागरीक, जीनोम सीक्वेन्सिंग अहवाल येण्याआधीच देश सोडला; दुसऱ्या रुग्णाच्या संपर्कातील 5 जण पॉझिटिव्ह आले.


   अयोध्येत साखळी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी, गुजरातमधून फोन आल्याचे तपासात स्पष्ट झाले, खबरदारी म्हणून अयोध्येत बंदोबस्त वाढवला गेला आहे.


   'मिर्झापूर' वेबसीरिजमधील मुन्ना भैय्याचा मित्र ललितचे (ब्रम्हा मिश्रा) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, तीन दिवसांनी मृतदेह बाथरूममध्ये सापडला असेही म्हंटले.


   वाहतूक नियमांचे उल्लंघन महागात पडणार; राज्यात नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी होणार असल्याची बातमी, दंडाच्या रकमेत मोठी वाढ झल्यचे दिसून येत आहे.


   सरकारी सेवेत लाचखोरीचे प्रमाण वाढले; नगर जिल्ह्य़ात गेल्या 5 वर्षांमध्ये कारवाई झालेले 80 जण चलिस् वयाच्या आतील सापडले.


    भारत-न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना आजपासून सुरु, मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना होणार, पण सामन्यावर पावसाचं सावट कायम राहील असेही सांगण्यात आलं.


   100 कोटीचे आरोप: परमबीर सिंग यांना राज्य सरकारने चौकशीनंतर त्यांना अटक करण्याची मागणी. आणि खंडणीचे दाखल आहेत पाच गुन्हे.


   राज्यात धुक्यांची चादर: अवकाळीचा पाऊस, वाढलेल्या गारठ्यामुळे अनेक ठिकाणी शेळ्या-मेंढ्या मृत पडल्या आहेत, अहमदनगर, सातारा, नाशिक, पुण्यात जास्त नुकसान झाल्याचं समजत आहे.


  राज्यात कालअखेर 796 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर 952 रुग्ण कोरोनामुक्त झाले, तसेच 24 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली; राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के इतका वाढलेला आहे.

                     धन्यवाद...

Comments