सहा बड्या कंपन्या डिझेल-पेट्रोलवर चालणारी वाहने बनवणं बंद करणार आहेत. ; भारतातील मोठी कंपनी सामील! वाचा!
सहा बड्या कंपन्या डिझेल-सहा बड्या कंपन्या डिझेल-पेट्रोलवर चालणारी वाहने बनवणं बंद करणार आहेत. ; भारतातील मोठी कंपनीचा त्यामध्ये समावेश ! वाचा!
कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यासाठीचा प्रयत्न करणाऱ्या सहा मोठ्या कार कंपन्या डिझेल-पेट्रोल वाहने तयार करणे बंद करणार आहेत. त्या 6 जागतिक कंपन्यांमध्ये विशेष असे की त्यामध्ये भारतीय टाटा समूहाच्या जॅग्वार लँड रोव्हर यासुद्धा कंपनीचा समावेश करण्यात आला आहे.
स्वीडनची व्होल्वो, अमेरिकेची फोर्ड आणि जनरल मोटर्स डेमलर एजीची मर्सिडीज बेंझ, चीनची बीवायडी आणि टाटा मोटर्स- जग्वार लँड रोव्हर ग्लासगोमध्ये प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करणार आहेत.
21 व्या शतकाच्या मध्यावर जागतिक तापमानवाढ नियंत्रित करण्यासाठी च्या मोहिमेची ही प्रतिज्ञा आहे. या अंतर्गत या कंपन्या 2040 पर्यंत पेट्रोल-डिझेल वर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन पूर्णपणे बंद करण्यात येतील असे सांगितलेले जाते.
सीओपी 26 समिटचे यजमान ब्रिटनने म्हटले आहे की या सहा कंपन्यांच्या व्यतिरिक्त आणखी चार देशांनी 2040 पर्यंत शून्य उत्सर्जन असलेल्या नवीन कार आणि वाहनांच्या धोरणावर सहमती दर्शवली आहे. यामध्ये न्यूझीलंड आणि पोलंड यांसारख्या दिग्गज देशांचा समावेश आहे.
काही माहितीच्या आधारे, टोयोटा मोटर कॉर्पोरेशन आणि फोक्सवॅगन एजी या जगातील मोठ्या मोटार कंपन्या यामध्ये सहभागी होणार नाहीत असे म्हटलं जातंय. त्याचप्रकारे, अमेरिका, चीन आणि जर्मनी, जे सर्वात मोठ्या कार बाजारपेठांपैकी एक आहेत, स्टेलांटिस हि जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी कार निर्माता कंपनी आहे , जपानची होंडा आणि निसान, जर्मनीची बीएमडब्ल्यू आणि दक्षिण कोरियाची ह्युंडाई ही देखील यामध्ये समाविष्ट नाहीत, असं सांगितलं जातंय.
Comments
Post a Comment