क्रिकेट:कसोटी मालिकेसाठी न्युझीलंड विरूद्ध भारतीय संघ जाहीर. तब्बल 4 वर्षानंतर फिरकीपटू संघात.

 क्रिकेट:कसोटी मालिकेसाठी न्युझीलंड विरूद्ध भारतीय संघ जाहीर. तब्बल 4 वर्षानंतर फिरकीपटू संघात.


भारतीय क्रिकेट मंडळानं न्यूझीलंड विरोधातील कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची नुकतीच घोषणा केली आहे. ह्या वेळी काही नवीन चेहऱ्यांना सुद्धा संघात संधी दिली आहे. एका खेळाडूला जवळपास 4 वर्षानंतर संघात खेळण्यासाठी संधी मिळाली आहे.

 न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताने कसोटी संघांची घोषणा केली असून. यावेळेस काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. पण यामध्ये एका खेळाडूचं संघात परत येण थोड आश्चर्यचकित वाटते आहे. तो खेळाडू म्हणजेच फिरकीपटू जयंत यादव. जवळपास 4 वर्षानंतर संघात जागा मिळालेल्या जयंत यादवने 4 वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात संघात खास कामगिरी न केलीने तो 4 वर्ष संघाबाहेरच होता.

भारतीय संघात टेस्ट सिरीज मधे श्रेयस अय्यर आणि प्रसिद्ध कृष्ण या नवीन खेळाडूंना जागा मिळाली असून. जवळपास 4 वर्षानंतर संघात परत आलेल्या जयंत यादवने शेवटचा कसोटी सामना 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. त्या सामन्यामध्ये त्याने दोन डावात फक्त 1-1 विकेट घेतल्या होत्या. आणि तेव्हा तो सामनतही भारत 303 धावांनी पराभव झाला होता. जयंतय यादवने त्याचा पहिला टेस्ट डेब्यू इंग्लंड या बल्हाढे संघाविरुद्ध वाइजॅग या ठिकाणी 2016 मध्ये केला होता. आतापर्यंत त्याने 4 टेस्ट मालिका मध्ये 11 विकेट्स घेतलेल्या आहेत. भारत आणि न्यूझीलंड यां संघांमध्ये एकुण 2 कसोटी सामने खेळविण्यात  येणार आहेत. 25 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर या दरम्यान पहिला टेस्ट सामना खेळविण्यात येणार असून, 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर या दरम्यान दुसरा व अंतिम कसोटी सामना खेळविण्यात येणार आहे.


पहिल्या दिवशी कसोटी सामन्या साठी टीम इंडियाचा संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा, केएस भरत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, जयंत यादव, ईशांत शर्मा, यू. यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्ण. अशाप्रकारे टिम इंडिया चा संघ असणार आहे. 

टी-20 मालिकेसाठी संघ यापूर्वीच जाहीर

 बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन टि-20 सामन्यांच्या  मालिकेसाठी भारताच्या संघाची घोषणा मंगळवारी केली गेली होती. टी-ट्वेन्टीच्या भारताच्या टीमच्या कर्णधारपदी रोहित शर्मा तर उपकर्णधारपदी केएल राहुल असणार आहे. या टी-ट्वेन्टीच्या मालिकेसाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे.

                 धन्यवाद....

Comments