हेडलाईन्स, 30 नोव्हेंबर 2021
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला. त्यामध्ये टीम इंडियाला शेवटच्या 52 चेंडूत एक विकेट न मिळाल्याने सामना अनिर्णित ठरला, श्रेयस अय्यर सामनावीर ठरला.
राज्यात सर्व शाळा 1 डिसेंबरपासूनच सुरू होणार असल्याच सांगितलं आहे. राज्य सरकारने जाहीर केली नियमावली; आवश्यक सर्व काळजी घ्यावी लागणार आहे.
लोकसभेत कृषी कायदे परत घेण्याचा ठरावल्ला मंजूरि देण्यात आली , चर्चेच्या मागणीवरून गदारोळ; लोकसभेचे कामकाज आजही स्थगित करण्यात आले.
परमबीर सिंह आणि सचिन वाझे या दोघांच्या भेटीमागे कोण आहे,? याची पूर्ण चौकशी व्हावी; असे काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनि मागणी केली.
मुंबईत 20 दिवसांत आफ्रिकेचे 1000 पर्यटक, ट्रेस करण्याचे जलद गतीने काम सुरू झाले आहे; पर्यटन मंत्री आदित्य ठाकरें यांनि माहिती दिली आहे.
जॅक डोर्सी यांनी सीईओ पदाचा राजीनामा दिला; पराग अग्रवाल यांची मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली.
हिवाळी अधिवेशन: विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन 22 डिसेंबरपासून मुंबईतच होणार असल्याची माहिती दिली आहे. लसीकरणाचे दोन डोस अधिवेश्नत् प्रवेश मिळणार असेही नियम सांगितले.
ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, ओमिक्रॉनवर स्पुटनिक लस सर्वात प्रभावी ठरणार असल्याचे गमलेया रिसर्च इन्स्टिट्युटने महत्त्वाचा दावा केला आहे.
रा ज्यात पुन्हा पावसाच्या सरींचा अंदाज हवामन् विभागाने दिला आहे, 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा इशाराहि देण्यात आला आहे.
राज्यात सोमवारी 536 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 853 रुग्ण झाले कोरोनामुक्त, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.07 टक्के पर्यंत वाढले आहे.
Comments
Post a Comment