26 नोव्हेंबर 2021 हेडलाईन्
इंधन दरवाढीनंतर आता विजही महागणार..?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर भारताच्या 4 बाद 258 धावा झाल्या आहेत; श्रेयस अय्यरच्या नाबाद 75 धावा, जडेजाच्या नाबाद 50 धावा झाल्या आहेत.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे छातीत दुखू लागल्याने काल रात्री रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल झाल्याचीं बातमी डिस्चार्ज मिळण्याची शक्यता.
भारतीय शेअर मार्केटमध्ये मोठी भरभराट होणार, येत्या डिसेंबरपर्यंत सेन्सेक्स 70 हजारांचा टप्पा ओलांडणार असल्याची माहिती मॉर्नग स्टॅनले यांच्या अह्वलनुसर्.
लोटे एमआयडीसीमधील घराडा केमिकलमध्ये गॅस गळती, त्रास होऊ लागल्यानं 17 कर्मचारी रुग्णालयात दाखल, एक कर्मचारी गंभीर असून चिपळूणच्या रुग्णालयात दाखल झाले.
गेवराई पोलिसांनी पकडल्या एकाच नंबरच्या आठ रिक्षा, गुन्हा दाखल, आठही रिक्षा पोलिसांनी घेतल्या ताब्यात; चालक आणि मालकांवर गुन्हे दाखल झाले.
नेत्यांची माघार, संपकऱ्यांचा नकार, संप सुरूच राहणार विलीनीकरणाच्या मागणीवर संघटना ठाम; महामंडळ संपकऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत
कालअखेर राज्यात 848 नव्या रुग्णांचे निदान झाले, एकूण 974 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले , एकूण 50 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला.
राज्य शासनाचं सलग दुसऱ्या वर्षी हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईतच् होणार आहे, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब देण्यात आला.
परमबीर सिंहांची गुन्हे शाखेकडून सात तास चौकशी चालू, सर्व आरोप खोटे असल्याचा परमबीर यांचा दावा ; आज शुक्रवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावलं आहे.
‘बोलो जुबां केसरी’, स्टेडियमध्ये गुटखा खात असतानाचा एका क्रिकेट फॅन्सचा व्हिडीओ व्हायरल झाल्यने; नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया चालू.
Comments
Post a Comment